वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला वजन वाढण्याची चिंता असते. जास्त वजनामुळे मधुमेहापासून ते रक्तदाबापर्यंत अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. आपल्या घरात असे अनेक पदार्थ असतात, ज्यांचे सेवन करून वजन नियंत्रित करता येते. जर तुम्ही पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुमच्या आहाराकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते. हे सात दाहक पदार्थ पोटाच्या चरबीशी जोडलेले आहेत आणि ते कमी केल्यानं तुमच्या पोटाची चरबी नियंत्रणात येऊ शकते. असे कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊयात.
पोटातील चरबी वाढवणारे सात पदार्थ
१. कोल्ड ड्रिंक
आइस्ड टी, फिजी कोला आणि पॅकेज्ड फ्रूट ज्यूस हे ताजेतवाने वाटू शकतात, परंतु त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. एल्सेव्हियर जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या २०१४ च्या अभ्यासानुसार, साखरेचे प्रमाण जास्त असलेली पेये केवळ वजन वाढवतातच असे नाही, तर पोटाच्या भागात चरबी जमा होण्यासदेखील मदत करतात. त्यांच्या नियमित सेवनाने इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका वाढू शकतो आणि भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडू शकतात.
२. पांढरा ब्रेड
पास्ता आणि पांढरा तांदूळ यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट्समध्ये फायबर आणि आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव असतो. २०१५ च्या एका संशोधन पत्रानुसार हे जलद पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यानंतर क्रॅश होते, यामुळे पोटाभोवती चरबी साठते.
३. प्रक्रिया केलेले मांस
सॉसेज, सॅलमी आणि इतर प्रक्रिया केलेले मांस सँडविचसाठी सोयीस्कर असू शकतात, परंतु ते प्रिझर्व्हेटिव्ह्ज, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्सने भरलेले असतात. हे घटक जळजळ वाढवू शकतात आणि चरबी जमा करण्यास कारणीभूत ठरू शकतात. जास्त खाल्ल्याशिवायही या मांसाचे सतत सेवन केल्याने कालांतराने पोटातील चरबी वाढू शकते.
४. तळलेले पदार्थ
चिप्स, पकोडे किंवा चिकन नगेट्स असोत, तळलेले पदार्थ बहुतेकदा ओमेगा-६ फॅटी अॅसिड असलेल्या कमी दर्जाच्या तेलांमध्ये शिजवले जातात. २०२४ च्या एका संशोधन पत्रात सुचवल्याप्रमाणे, वारंवार खाल्ल्यास ते जळजळ वाढवतात. नियमित सेवनामुळे चरबी सतत वाढत राहते, विशेषतः पोटाभोवती.
५. पॅकेज केलेले स्नॅक्स आणि बिस्किटे
चहासोबत बिस्किटे किंवा चिप्स अनेक जण खातात पण ते बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे तेल वापरतात. २०२० च्या एका अभ्यासात हे घटक हळूहळू चरबी जमा करण्यास कसे प्रोत्साहन देतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, विशेषतः पोटाच्या भागात. त्यांच्या जलद पचनामुळे इन्सुलिन स्पाइक्स वाढतात आणि कालांतराने तुमचे चयापचय मंदावते.
६. मद्य
कधीकधी मद्यपान केल्याने नुकसान होऊ शकत नाही, परंतु नियमित मद्यपानाचा थेट संबंध पोटाच्या चरबीशी आहे. १९९६ च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मध्यम मद्यपानामुळेदेखील यकृताच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, चयापचय मंदावतो आणि पोटातील चरबी जमा होऊ शकते. अल्कोहोल आतड्याच्या अस्तरांना त्रास देऊ शकतो, पोषक तत्त्वांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतो आणि झोपेला त्रास देऊ शकतो – या सर्वांमुळे जळजळ आणि वजन वाढते.
निरोगी जीवनशैली राखण्यासाठी तुमच्या जेवणात हे पदार्थ किती वेळा येतात याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित करा, पालेभाज्या, काजू आणि संपूर्ण धान्य यांसारखे पदार्थ समाविष्ट करा आणि तुमच्या पोटातील चरबी मुळापासून नष्ट करा.