टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे ब्रॉडबँड कंपन्याही अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर आणत आहेत. अशीच एक भन्नाट ऑफर आली आहे, यामध्ये युजर्सना 300Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतोय. जीवघेण्या करोना व्हायरसमुळे अनेक कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना घरुन काम करताना काही समस्या जाणवू नये यासाठी ACT फायबरनेट कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ची भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ 31 मार्च 2020 पर्यंतच घेता येईल. यासाठी कंपनीकडून कोणतेही अतिरिक्त शूल्क आकारले जाणार नाही. ACT फायबरने पहिल्यांदाच अनलिमिटेड डेटाचा ब्रॉडबँड प्लॅन लाँच केलाय. त्यामुळे ही ऑफर म्हणजे युजर्ससाठी एखाद्या बेस्ट डीलप्रमाणे आहे. जाणून घेऊया या ऑफरमध्ये काय आहे खास आणि कसा घ्यायचा लाभ?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना सर्वप्रथम प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमधून ACT फायबरनेटचं अॅप डाउनलोड करावं लागेल. कंपनीकडून या ऑफरबाबत युजर्सना ईमेलद्वारे माहिती दिली जात आहे. याशिवाय ऑफरबाबत कंपनीने एक ट्विटही केलंय. या प्लॅनच्या ऑफरसोबत युजर सध्याच्या प्लॅनचा स्पीडही अपग्रेड करु शकतात. अॅपमध्ये लॉग-इन केल्यानंतर स्पीड अपग्रेड करता येईल. ही ऑफर देशभरात उपलब्ध आहे. या ऑफरची अजून एक खासियत म्हणजे याच्या बेसिक प्लॅनमध्येही 100 Mbps स्पीड अपग्रेड दिला जातोय. याशिवाय कंपनीने काही नुकतीच नेटफ्लिक्ससोबत भागीदारी केलीये. त्यामुळे कंपनी युजर्सना नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनवर अतिरिक्त डेटा आणि बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनीच्या ACT Blaze प्लॅनमध्ये युजर्सना 100Mbps च्या स्पीडने 450जीबी डेटा मिळेल. तर, 1059 रुपयांचा प्लॅन सहा महिने किंवा एका वर्षासाठी सब्सक्राइब केल्यास 1500जीबी अतिरिक्त डेटा मिळेल.
Feel the work from home advantage! To enhance your work efficiency at home due to the present scenario, we are upgrading your speeds to 300 Mbps* and providing you unlimited FUP for March 2020 at NO EXTRA COST. To avail the offer, log on ACT Fibernet App https://t.co/Gwz4nwtNjX pic.twitter.com/Mx3hZ73qKJ
— ACT Fibernet (@ACTFibernet) March 7, 2020
याशिवाय कंपनीकडे ACT स्टॉर्म, ACT लायटिंग, ACT इन्क्रेडिबल आणि ACT गीगा हे अन्य प्लॅन्सही आहेत. ACT गीगा ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 1Gbps स्पीड मिळतो. पण, कंपनीचा हा प्लॅन सध्या केवळ हैदराबाद, बेंगळुरु आणि चेन्नईमध्येच उपलब्ध आहे. कंपनी लवकरच देशातील अन्य शहरांमध्येही हा प्लॅन लाँच करण्याची शक्यता आहे.