सकाळी उठल्यावर कामांची आणि ऑफिसला जायची इतकी गडबड असते की ब्रेकफास्ट काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ब्रेकफास्ट हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून तो न करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. जे लोक सकाळी काहीच न खाता बाहेर पडतात त्यांना दिवसभर भूक लागत राहते आणि ते शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातात. यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. पण काही ठराविक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्याचा वजन नियंत्रणात राहण्यासाठी निश्चितच फायदा होतो. पाहूयात काय आहेत हे पदार्थ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. पोळी – गव्हाच्या पीठामध्ये सोयाबीन, नाचणी किंवा ओट्सचे पीठ मिसळून त्यामध्ये हिरव्या भाज्या वापरुन पोळी तयार करा. ही पोळी चवीला चांगली लागतेच त्याशिवाय आरोग्यासाठीही चांगली असते. यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने ती पचण्यासही सोपी असते.

२. दलिया – दलियामध्येही मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे अन्नपचन चांगले होते. याशिवाय दलियामध्ये कार्बोहायड्रेटस आणि खनिजांचे प्रमाणही जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.

३. अंडे – अंड्यात ए, बी आणि ई ही प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग लाभदायक असतो. अंड्याच्या बलकात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने ते खाऊ नये. भाज्या आणि ब्रेडच्या स्लाईससोबत अंडे खाल्ल्यास ते आरोग्यासाठी चांगले असते.

४. ओट्स – ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ओट्स खाल्ल्यानंतर खूप वेळासाठी पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे सारखे खायची इच्छा होत नाही. वजन कमी करण्यासाठी ओट्स अतिशय उपयुक्त असते. यामध्ये अँटिऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

५. मल्टिग्रेन ब्रेड सँडविच – या सँडविचमध्ये तुम्ही विविध भाज्यांचा वापर करु शकता. सँडविचमध्ये पनीर स्लाईसचाही वापर करु शकता. यामुळे सँडविच पोषक होईल. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, बी, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Add this foods items in your breakfast for quick weight loss
First published on: 18-12-2017 at 18:16 IST