Consume banana for avoid cancer: फळे आपल्या शरीर, मेंदू आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. काही फळे महाग असतात; तर काही स्वस्त असतात आणि काही फळे वर्षभर उपलब्ध असतात. वर्षभर उपलब्ध असलेल्या फळांपैकी केळी हा ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे. त्यात ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज यांसारख्या नैसर्गिक साखरेचे प्रमाण असल्याने, त्यातील कार्बोहायड्रेट्स त्वरित ऊर्जा प्रदान करतात. जिमला जाणारे लोक सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे केळी खातात. दररोज सकाळी दोन केळी खाल्ल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत होते.

शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते रोगांपासून संरक्षण करते

दररोज एक केळे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. हे फळ पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यातील फायबरचे प्रमाण पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळते. पिकलेली केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. केळे हा ट्रिप्टोफॅन नावाच्या अमिनो आम्लाचा स्रोत आहे, जे आम्ल सेरोटोनिनच्या निर्मितीस मदत करते आणि मूड सुधारते.

केळी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का?

भारतातील आघाडीचे ऑन्कोलॉजिस्ट व कॅन्सर हीलर सेंटरचे तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा स्पष्ट करतात की, केळे हे एक असे फळ आहे, ज्यामध्ये लपलेल्या शक्ती पोटातील व्रण आणि कर्करोगावर उपचार करू शकतात. केळे कर्करोगापासून कसा बचाव करते आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

केळी कर्करोग रोखण्यास कशी मदत करतात?

केळ्यामध्ये फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पोटाच्या आवरणाचे संरक्षण करतात. केळी खाल्ल्याने अतिरिक्त श्लेष्मा तयार होतो, जो पोटातील हानिकारक आम्लांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. एच. पायलोरी हा एक असा जीवाणू आहे, जो अल्सर आणि पोटाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. दररोज केळी खाल्ल्याने कर्करोग निर्माण करणारे हे जीवाणू नष्ट होतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे फ्री रॅडिकल्स नष्ट करतात.

केळ्यामध्ये आढळणारी नैसर्गिक संयुगे, जसे की फिनोलिक संयुगे आणि फ्लेवोनॉइड्स ही जळजळ कमी करतात. नियमितपणे केळी खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि पोषक तत्वे मिळतात, जे पेशींचे संरक्षण करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. मजबूत रोगप्रतिकार शक्ती शरीराला कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी लढण्यास मदत करते.

केळी पचनासाठी वरदान

केळी हे पचन प्रक्रिया सुरळीत करणारे फळ आहे. केळ्यामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर असते. फायबर आतड्यांमधून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे मोठे आतडे व पचनसंस्था निरोगी राहते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.