Home remedies to get rid of lizards: जवळजवळ प्रत्येकजण पालीला घाबरतो. घराच्या भिंतींवर, स्वयंपाकघरातील भिंतींच्या मागे आणि ट्यूबलाइट्सवर पाली दिसतात. ते सर्वत्र, त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना पळवून लावणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. चांगल्या आरोग्यासाठी घर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. अनेक घरांमध्ये पाली भिंतींवर फिरताना दिसतात. पण काही सोप्या मार्गांनी तुम्ही पालींपासून सुटका मिळवू शकता.आम्ही सांगितलेले ‘हे’ घरगुती उपाय करा एक पालही पुन्हा घरात दिसणार नाही.

कांदा लसूण

कांदा लसूणच्या वासाने घरात पाली येत नाहीत. यासाठी किचनच्या कानाकोपऱ्यात कांदा लसुणचा वापर करून बनवलेला स्प्रे मारावा. यामुळे किचनमधील पाली कायमच्या गायब होतील. कांदा आणि लसुणचा उग्र वास पालींना आवडत नाही. याशिवाय किचनच्या कोपऱ्यात तुम्ही कांदा किंवा लसूण पाकळी सुद्धा ठेवू शकता. यामुळे पाली येणार नाहीत.

​अंड्याच्या सालीचा वापर

नॅप्थॅलीन बॉल्स हे एक चांगले कीटकनाशक आहे, म्हणून हे नॅप्थॅलीन गोळे घरातील प्रत्येक ठिकाणी ठेवा जेथे पाली जास्त येतात त्या ठिकाणी हे ठेवल्याने वासामुळे पाली पाळून जातात.जर तुम्ही अंडी खात असाल तर अंड्याची टरफले डस्टबिनमध्ये टाकण्याऐवजी जिथे सरडे येतात तिथे ठेवा. एक-दोन दिवस असे केल्याने पाली निघून जाण्यास मदत होईल.

मिरचीचा स्प्रे

स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात लाल तिखट टाकून मिक्स करा. तयार केलेला स्प्रे किचन किंवा पाल येते त्या ठिकाणी मारल्यास घरात कधीही पाल येणार नाही. मिरचीच्या वासामुळे पाली घरात येत नाहीत. याशिवाय अंड बनवल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करून किचनच्या इथे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवल्यास घरात पाली येणार नाहीत.

कडुलिंबाचा स्प्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोपात पाणी गरम करून त्यात कडुलिंबाची पाने टाकून उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करा. थंड झालेले पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. त्यानंतर हा स्प्रे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मारल्यास अजिबात पाली येणार नाहीत. घरात सतत जर पाली येत असतील तर कुठेही अन्नपदार्थ उघडे ठेवू नये.