‘मोठी बचत, अधिक आनंद’ असं म्हणत पुन्हा एकदा अॅमेझॉनने त्यांच्या अजून एका सेलची घोषणा केली आहे. ५ ते ९ ऑगस्ट या कालावधीत उत्पादनांवर मोठी बचत देणाऱ्या ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिवल’ सेलची घोषणा केली आहे. मोबाईल फोन्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स, अॅमेझॉन बिजनेस फॅशन आणि ब्युटी उत्पादने, होम आणि किचन, किराणा, लार्ज अप्लायंसेस, वर्क आणि स्टडी फ्रॉम होमच्या वस्तू आणि अशा बऱ्याच वस्तूंवर सूट असणार आहे. या सेलमध्ये महिला उद्योजक, उदयोन्मुख व्यवसाय, ब्रॅण्ड्स अशा विक्रेत्यांकडून लाखो उत्पादनांची खरेदी अॅमेझॉनवर करू शकता. जाणून घेऊयात या सेलविषयी अधिक माहिती.

या ब्रॅण्ड्सवर आहे सूट

या ग्रेट फ्रीडम फेस्टिवलमध्ये  ग्राहक किराणा आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवर मोठी बचत करू शकतात. जसे की सर्फ एक्सेल, कॅडबरी, हिमालया, कोलगेटवरती ऑफर्स आहेत. सॅमसंग, वनप्लस, रेडमी, टेक्नो, IQOO  यांसारख्या मोबाईर फोन ब्रॅण्ड्सवरही सूट आहे. होम अप्लायंसेसमध्ये आयएफबी, सॅमसंग, एलजी, वर्लपूल, गोदरेज या ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांवर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल.  होम फर्निचर या विभागात होमसेंटर, पेपरफ्राय, स्टोन अँड बीम, वुडव्हिले, पॉलिस्टर हे ब्रॅण्ड्स सेलमध्ये आहेत तर  होम, किचन आणि स्पोर्ट्समध्ये ऍक्वागार्ड, बजाज, पिजन, कल्टस्पोर्ट्स, अग्रेसर फॅशन ब्रॅण्ड्स जसेकी लेविस, एडिडास, टायटन, सॅमसोनाईट, यूएसपीए हे ब्रॅण्ड्स आहेत. ग्राहकांना अॅमेझॉन इको, फायर टिव्ही, किंडल डिव्हाईस यावर सुद्धा मोठी डील मिळू शकते. ग्रेट फ्रीडम फेस्टिवल मध्ये भारतीय लघु आणि मध्यम व्यवसाय सुद्धा सहभागी आहेत.

या बँकांच्या क्रेडीट कार्डवर अधिक सूट

एसबीआय क्रेडिट कार्ड्स आणि क्रेडिट इएमआय वर तात्काळ १०% सूट दिली जाणार आहे.  अॅमेझॉन पे सह सुरक्षित आणि जलद पेमेंटचा आनंद सुद्धा ग्राहकांना घेता येणार आहे. अॅमेझॉन पे सह साईन अप करा आणि १०००  रूपये कॅशबॅक मिळवा अशी खास ऑफरही आहे. या डील्स आणि सूट पूर्णपणे विक्रेत्यांकडून किंवा ब्रॅण्ड्स कडून देण्यात आल्या आहेत त्यामध्ये अॅमेझॉन चा कुठलाही सहभाग नाही.