Amazon Deals on Laptops : लॅपटॉप घ्यायचा विचार करताय? ३० हजार ते ६५ हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या लॅपटॉपबद्दलची माहिती आज तुम्हाला सांगणार आहोत. या लॅपटॉपवर ग्राहकांना सर्वाधिक सूट मिळणार आहे. यामध्ये Acer आणि Lenovo ब्रांडच्या लॅपटॉपचा समावेश आहे. Amazonवर या लॅपटॉपवर ४१ टक्केपर्यंतची सूट देण्यात आली आहे. जाणूनन घेऊयात Acer आणि Lenovo च्या सूट मिळणाऱ्या लॅपटॉपबद्दल…

Acer Aspire 3 Laptops :
तुमचं बजेट ३५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही Acer Aspire 3 या लॅपटॉपचा विचार करु शकतात. हा लॅपटॉप अमेझॉनच्या संकेतस्थळावर उपलबद्ध असून यावर २६ टक्केंची सूट आहे. डिस्काउंटनंतर Acer Aspire 3 या लॅपटॉपची किंमत ३३ हजार ९९० रुपये आहे. याआधी हा लॅपटॉप ४५ हजार ९९० रुपयांना होता. Acer Aspire 3 या लॅपटॉपवर १२ हजार ९ रुपयांची सूट आहे.

या लॅपटॉपच्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये इंटेल कोर आई 3 प्रोसेसर, 15.6 इंच (1920 x 1080 पिक्सल) डिस्प्ले, 4 जीबी रॅम DDR4, 1 टीबी हार्ड डिस्क, विंडोज 10, इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आला आहे. लॅपटॉप 64 बिट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतेय. याचं वजन १ किलो ९०० ग्रॅम इतके आहे.

Lenovo ThinkPad E14 Laptops –
लॅटपटॉपचं तुमचं बजेट ४२ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर Lenovo ThinkPad E14 याचा विचार करु शकता. फिचर्सचा विचार केल्यास यामध्ये इंटेल कोर आय 3 प्रोसेसर, 14 इंच (1920X1080 पिक्सल) फुल एचडी आईपीएस डिस्प्ले आहे. 720p एचडी कॅमरा, लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम आणि 256 जीबी एसएसडी स्टोरेज आहे. विंडोज 10 होमसह येणाऱ्या या लॅटपटॉपचे वजन एक किलो ७०० ग्रॅम आहे.

Lenovo ThinkPad E14 लॅपटॉपवर 35 टक्केंची सूट देण्यात आली आहे. डिस्टाउंटनंतर ThinkPad E14 या लॅपटॉपची किंमत ४१ हजार ९९० रुपये आहे. डिस्काउंटपूर्वी या लॅपटॉपची किंमत ६४ हजार ८७२ इतकी होती. म्हणजेच ThinkPad E14 या लॅपटॉपवर २२ हजार ८८२ रुपयांची सूट देण्यात आली आहे.

Lenovo Ideapad Slim 3i Laptop :
५० हजार रुपयांपर्यंतचं तुमचं बजेट असेल तर अमेझॉनवर Lenovo Ideapad Slim 3i हा लॅपटॉप विकत घेऊ शकता. लॅपटॉपमध्ये इंटेल कोर आय 5 प्रोसेसर, 15.6 इंच फुल एचडी (1920×1080 पिक्सल) डिस्प्ले आहे. तसेच एंटी-ग्लेयरसह 8 जीबी रॅम, 1 टीबी हार्ड डिस्क आणि 256 जीबी एसएसडी स्टोरेज, प्री इंस्टॉल्ड एमएस ऑफिस होम एण्ड स्टूडेंट 2019 आहे.

या लॅपटॉपवर ३२ टक्केंची सूट देण्यात आली आहे. ७५ हजार ३९० रुपयांचा Lenovo Ideapad Slim 3i हा लॅपटॉप ३२ टक्के डिस्काउंटनंतर ५० हजार ९९० रुपयांना सध्या उपलबद्ध आहे. म्हणजेच सध्या हा लॅपटॉप विकत घेतल्यास तुमची २४ हजार ४०० रुपयांची बचत होईल.

Acer Nitro 5 Laptops :
दिसायला आकर्षक आणि गेमिंगसाठी असेलला Nitro 5 हा लॅपटॉप सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये ग्राहकांना इंटेल कोर आय 5-9300 एच प्रोसेसरसह 15.6 इंच फुल-एचडी (1920 x 1080 पिक्सल) डिस्प्ले आहे. याशिवाय या लॅपमध्ये 8 जीबी रॅम, 1 टीबी हार्ड डिस्क आणि 256 जीबी एसएसडी स्टोरेज, विंडोज 10 होम, NVIDIA GeForce GTX 1650 ग्राफिक्स देण्यात आलं आहे.

Acer Nitro 5 या लॅपटॉपवर 41 टक्केंची सूट देण्यात आली आहे. एक लाख ९ हजार ९९९ रुपयांचा Acer Nitro 5 हा लॅपटॉप ६४ हजार ९९० रुपयांना मिळतोय. Acer Nitro 5 या लॅपटॉपवर ४५ हजार ९ रुपयांची सूट मिळतेय.