Amla kadha benefits: हिवाळ्याच्या दिवसात शरीराची अधिक काळजी घेतली जाते. या ऋतूमध्ये बहुतेक लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत आवळ्याचा काढा पिणे खूप उपयुक्त आहे. हे रोज प्यायल्याने अनेक फायदे होतात. आवळ्याचा काढा प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि पचनही सुधारते.

आवळ्याचा काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४-५ ताजे आवळे
  • २ कप पाणी
  • ५-६ तुळशीची पाने
  • आलं
  • मध

आवळ्याचा काढा कसा बनवायचा?

आवळ्याचा काढा तयार करण्यासाठी सर्वप्रथम आवळ्याचे लहान तुकडे करा आणि ते एका पातेल्यात दोन ते तीन कप पाणी घेऊन गरम करा. आता त्यात आवळा, आलं आणि तुळशीची पाने टाका. १५ मिनिटे व्यवस्थित शिजवा. मिश्रण निम्मे झाल्यावर गाळून घ्या आणि त्याची चव वाढवण्यासाठी त्यात मध टाका.

Hair identifier spray
शेव्हिंग करण्यापूर्वी हेअर आयडेंटिफायर स्प्रेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Causes of unwanted hair growth
Facial Hair : हनुवटी आणि गालावर भरपूर केस येतात? मग ‘ही’ असू शकतात कारणे; करू नका दुर्लक्ष
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
water intake
पाणी कसे व किती प्यावे?
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?

हेही वाचा: कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?

आवळ्याचा काढा कधी प्यावा?

  • तुम्ही आवळ्याचा काढा कधीही पिऊ शकता. मात्र, तो सकाळी रिकाम्या पोटी पिणे खूप फायदेशीर आहे. तसेच तुम्ही तो दिवसातून दोनदा पिऊ शकता. परंतु, तो नेहमी ताजा बनवून प्यावा.
  • केस घनदाट करण्यासाठी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी आवळ्याचा काढा
  • केस आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवळ्याचा काढा जास्त चांगला आहे. त्यात व्हिटॅमिन-सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे केसांचे पोषण करतात आणि मुळे मजबूत करतात. तसेच हे चयापचय गतिमान करते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. आवळ्याच्या उकडीने पचनक्रिया सुधारते.

Story img Loader