जर तुमच्याकडेही Apple चा आयफोन असेल, पण मास्क घातल्यामुळे फोन अनलॉक करताना समस्या उद्भवत असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या iOS 14.5 बीटा व्हर्जनमध्ये हे फिचर आणलं आहे. या अपडेटमधील खासियत म्हणजे मास्क घातलेलं असतानाही आयफोनला फेस आयडीद्वारे अनलॉक करता येतं. iOS 14.5 च्या अपडेटमध्ये अनेक बग फिक्स करण्यात आले आहेत.

नवीन अपडेटमध्ये अ‍ॅपलने आयफोनमध्ये मास्क असताना फेस अनलॉकचा पर्याय तर दिला आहे, पण यामध्ये एक समस्या आहे. ज्यांच्याकडे अ‍ॅपल वॉच आहे केवळ त्याच युजर्सना आयफोन अनलॉकसाठी फेस अनलॉकचा वापर करता येणार आहे. अ‍ॅपल वॉच अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला फोनमध्ये बघावं लागेल, त्यानंतर फोन अनलॉक होईल.

आणखी वाचा- मोबाइल फोनसोबत चार्जरही महाग, जाणून घ्या सर्व सामान्यांच्या खिशावर किती पडणार भार?

आयफोन अनलॉक झाल्यानंतर तुमच्या स्मार्टवॉचवर एक व्हाइब्रेशनही होईल. iOS 14.5 चं अपडेट आल्यानंतर हे फिचर ऑटोमॅटिक काम करणार नाही. तुम्हाला स्वतःला हे फिचर (Settings > Face ID & Passcode) ऑन करावं लागेल. या अपडेटनंतरही फेस अनलॉकद्वारे पेमेंट आणि काही महत्त्वाची कामं करता येणार नाहीत. त्यामुळे नवीन अपडेट सर्वांसाठी तर नाही पण अ‍ॅपल वॉच असलेल्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.