Winter Foods For Kids : बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो. प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे हिवाळ्यात मुलं लगेच आजारी पडतात. त्यामुळे या काळात त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. अशातच आता हिवाळा सुरु झाला असून दिवाळीच्या सुट्ट्या देखील लागल्या आहेत. त्यामुळे मुलं सतत बाहेर खेळायला जाणार यात शंका नाही. त्यामुळे त्यांची हिवाळ्यात काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

हिवाळ्यात मुलांना सर्दी, खोकला, तापाचा त्रास होतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे मुलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. पालक आपल्या मुलांना हंगामी संसर्गापासून वाचवण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु तरीही मुले काही आजारी पडतात. हिवाळ्याच्या काळात जर तुमच्या मुलंही वारंवार आजारी पडत असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण या लेखात आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्सबद्दल माहिती सांगणार आहोत, जी खाल्ल्याने मुलांची प्रतिकारशक्ती वाढू शकते.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

हेही वाचा- सकाळी उठल्यानंतर करू नयेत ‘या’ गोष्टी; शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

फळे

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात फळांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही त्यांना संत्री, द्राक्षे अशा प्रकारची फळे खायला देवू शकता. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे अनेक आजार टाळता येतात. तसेच या फळांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणून ओळखले जाते. मुलांना फळे खायला आवडत नसतील तर त्यांना फळांचा ज्यूस द्या.

दही

प्रोबायोटिक्स युक्त दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मुलांच्या दैनंदिन आहारात पुरेशा प्रमाणात दह्याचा वापर केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. दह्यामध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

हिरव्या पालेभाज्या

पोषक तत्वांनी युक्त हिरव्या भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. भाज्यांमध्ये असलेले फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मुलांच्या आहारात पालक, ब्रोकोली यांसारख्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक असतात. या भाज्यांपासून तुम्ही सूप देखील बनवू शकता, जे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी देखील असते.

हेही वाचा- Knee Pain: लालबुंद स्ट्रॉबेरी खाल्ल्याने गुडघेदुखी कशी कमी होते? तज्ज्ञांच्या Video वर डॉक्टर काय म्हणतात वाचा

आले

आले हे अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. आल्याला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे छोटे तुकडे करुन त्यामध्ये गूळ घाला आणि ते मुलाला खायला देऊ शकता. आले खाल्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांचे आजारांपासून रक्षण होईल.

बेरी (Berries)

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी सारख्या बेरीमध्ये (Berries) अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमच्या मुलाची प्रतिकारशक्ती वाढू शकते. जर मुलांना ते खायला आवडत नसेल तर तुम्ही या फळांपासून स्मूदी बनवू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला सुद्धा घ्या)