Dark Circle Cream: चेहरा कितीही सुंदर असला तरी, डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. झोपेचा अभाव, पोषक तत्त्वांचा अभाव, माणसिक तणाव अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांचा त्रास होत असेल, तर तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करून ही वर्तुळे तुम्ही नक्कीच कमी करू शकता.

डोळ्यांखालची काळी वर्तुळे या उपायांनी करा कमी

काकडी

काकडी लावल्याने डोळ्यांखालीची काळी वर्तुळे कमी होतात. कारण- त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यात सौम्य तुरट गुणधर्म असतात. त्यासाठी काकडीचे तुकडे तुमच्या बंद डोळ्यांवर १०-१५ मिनिटे ठेवा. त्यानंतर तोंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

बदाम तेल

बदाम तेल डोळ्यांखालील सूजदेखील कमी करते, ज्यात सूज कमी करणारे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत आणि त्यामुळे काळी वर्तुळे कमी होतात. ते लावण्यासाठी प्रथम तुमचे हात आणि चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर डोळ्यांखाली बदाम तेल लावून हलक्या हाताने मालिश करा.

कोरफड

कोरफडीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. कोरफडीमुळे काळे डाग कमी करण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी दररोज चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते.

बटाटा

बटाट्यामुळे डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर असतात. त्यासाठी एक बटाटा घ्या आणि त्याचे गोल तुकडे करा. आता हे गोल तुकडे प्रभावित भागावर ५-१० मिनिटांसाठी लावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिटॅमिन-ई

व्हिटॅमिन-ई असलेले तेल आणि कॅप्सूल ओलावा देतात. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्याचे अँटीएजिंग गुणधर्म सुरकुत्या कमी करण्यासदेखील मदत करतात. त्यासाठी व्हिटॉमिन-ई जेलवर आधारित कॅप्सूल उघडा आणि त्यातील द्रव एका भांड्यात ओता. ते कॅरियर ऑइलमध्ये मिसळा. हे मिश्रण डोळ्यांखाली लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या.