Never Fall in These 5 Types of Men: बहुतेक लोक लग्नापूर्वी त्यांच्या जोडीदाराची आर्थिक शिस्त पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. या कारणामुळे खराब क्रेडिट म्हणजेच सिबिल स्कोअरच्या आधारे विवाह तुटत आहेत. लग्न ही आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे लग्न करताना आपला होणारा जोडीदार कसा असावा, याबाबत अलीकडच्या काळातील मुलींमध्ये जागरुकता वाढली आहे. जोडीदार काय करतो, त्याला आवडी निवडी काय, तो दिसतो कसा, बोलतो कसा, त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे; एवढंच काय तर त्याची कौटुंबिक तसेच सामाजिक पार्श्वभूमीही पाहिली जाते.

परंतु, हे सगळं करूनही अनेक मुलींची लग्न मोडतात. तेव्हा अनेकांच्या मनात हा विचार येतो की, आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर पडलो नाही? ही धास्ती खरी ठरून आपलं रिलेशनशिप हे खराबही होऊ शकतं. आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो आहोत हे कसं ओळखायचं? या जगात पाच प्रकारचे पुरुष असतात, ज्यांच्या प्रेमात पडल्यानं तुमचे नुकसानही होऊ शकते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया.

तुलना करणं

सर्व बाबतीत सतत दुसऱ्यांशी तुलना करण्याची सवय वाईटच. तुलना केल्यामुळे गोष्टी सुधारत नाही तर बिघडतात. तुलना करण्याची सवय असल्यास जोडीदार कितीही चांगला/ चांगली असल्यास, तिने/ त्याने कितीही चांगलं केलं तरी समाधान वाटत नाही. दुसऱ्यांशी तुलना करून जोडीदारात, त्याच्या कृतीत, सवयीत चुका शोधल्या जातात. व्यक्ती आणि स्वभाव हे वेगवेगळे असतात, ही बाब समजून घेऊन जोडीदाराकडे बघणं गरजेचं असतं. तुलना करण्याची सवय जोडीदारात कमीपणाची भावना निर्माण करते.

सतत कामात व्यस्थ, वेळ न देणे

जर तुमचा पार्टनर हा सतत कामात व्यस्त असेल आणि तुम्हाला योग्य तो मान आणि वेळ देत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी जे काही करताय ते फार काही फळाला येणार नाही. त्यातून तो आत्ममग्न असेल आणि तुमच्याकडे लक्षही देत नसेल तर तुमच्या रिलेशनशिपला काहीच अर्थ राहत नाही.

आदर

बरेच लोक म्हणतात, नात्यात प्रेम सर्वात जास्त महत्त्वाचं असतं; पण खरं तर नात्यात प्रेमापेक्षाही आदर सर्वात वरच्या स्थानी असतो. कोणताही मुलगा आपल्या प्रेयसीला कितीही पॅम्पर करो, तिचे लाड करो अथवा तिच्यावर पैसा उधळो; पण जोपर्यंत तो तिला आदर देत नाही तोपर्यंत कोणतीच स्वाभिमानाला श्वासासारखं जपणारी मुलगी त्याच्यासोबत राहणार नाही.

खोट बोलणं

जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवू शकत नाही, तेव्हा ते भावनिकदृष्ट्या टॅक्सिंग आणि खूप आव्हानात्मक असू शकते. जेव्हा तो माणूस तुमच्याशी खूप खोटे बोलतो तेव्हा तुम्ही त्याच्यासारख्या एखाद्या व्यक्तीसोबत राहण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला पाहिजे. जर तो अनेक आश्वासने देतो पण एकही पाळत नाही, तुम्हाला नेहमी अंधारात ठेवतो, तुमची फसवणूक करत असेल तर वेळीच त्याच्यापासून लांब राहा.

हेही वाचा – पालकांनो, मुलं अभ्यास करत नाहीत? अभ्यासाची गोडी लावण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

प्रेम नाही लस्ट

बहुतेक विवाहित पुरुष प्रेमासाठी नाही तर लस्टसाठी पत्नी सोडून इतर स्त्रियांसोबत फिरतात. त्यापैकी काहीजण विवाहित असल्याची सत्यता लपवतात आणि काहीजण त्यांचे वैवाहिक जीवन वाईट आहे असं सांगून त्या महिलेबरोबरचे नाते पुढे नेतात. दोन्ही प्रकरणांमध्ये केवळ महिलांनाच त्रास सहन करावा लागतो. त्या आपल्याकडे असलेले सर्व काही देतात आणि त्या बदल्यात त्यांच्या वाट्याला फक्त फसवणूकच मिळते.