अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी आपल्याला नकळत लठ्ठपणाचे शिकार बनवतात. अनावधानाने येणारा लठ्ठपणा कमी करणे सोपे नाही. बहुतेक लोकं वजन कमी करण्यासाठी कठोर आहार आणि व्यायामाचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की या दोन्ही पद्धतींचा अवलंब करूनही अनेकांना वजन कमी करता येत नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही लोकं वजन कमी करण्यासाठी अस्वास्थ्यकर पद्धतींचा अवलंब करत आहेत, जसे की कोणाच्या पोटावर चरबी जास्त आहे, तर कोणाच्या मांडीवर जास्त चरबी आहे.त्यात ही काही लोकं चरबी कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करत असतात. परंतु लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा एक अस्वास्थ्यकर मार्ग आहे.

वजन कमी करायचे असेल तर ते कमी करण्याचे काही उपाय समजून घेणे गरजेचे आहे. सुप्रसिद्ध योग तज्ज्ञ आणि द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक हंसा जी योगेंद्र सांगतात की, बरेच लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु यादरम्यान त्यांच्याकडून जाणूनबुजून किंवा नकळत अनेक चुका होतात. उदाहरणार्थ- आपण फक्त एक ते दोन तास शरीर सक्रिय ठेवतो, त्यामुळे आपले वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी शरीराची दिवसभराची क्रिया आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करताना आपण कोणत्या ५ चुका करतो.

कमी किंवा जास्त प्रमाणात प्रथिने सेवन करणे

वजन कमी करण्यात प्रथिनांच्या सेवनाची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यात प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन हा वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो, परंतु प्रथिनांमध्ये कॅलरीज असतात आणि कोणत्याही स्वरूपात जास्त प्रमाणात कॅलरी घेतल्यास वजन वाढू शकते. अधिक प्रथिनांचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही मर्यादित प्रथिनांचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी मसूर आणि अंबाडीच्या बियांचे आहारात समावेश करा.

जंक फूडला डाएटमधून वगळणे

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आवडीचा आहार वगळा. बाहेरचा पिझ्झा, बर्गर, रिफाईंड किंवा प्रोसेस्ड फूड खाणे टाळा. तुम्ही ते अधूनमधून सेवन करू शकता, पण जर तुम्हाला हे पदार्थ रोज खाण्याची सवय असेल तर ते सोडून द्या.

संतुलित आहाराचे सेवन कमी करणे

संतुलित आहार ही एक अशी योजना आहे जी लोकं कमी कालावधीत जलद वजन कमी करण्यासाठी फॉलो करतात. या आहार योजनेचे उद्दिष्ट आहे की दररोज आहारातून घेतलेल्या कॅलरीचे कमी सेवन करणे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हेल्दी पद्धतीने वजन कमी करा. वजन कमी करण्यासाठी आहारातून जंक फूड, प्रोसेस फूड आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे.

गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे

वजन कमी करण्यासाठी, जास्त व्यायाम आणि वर्कआउट्सचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जास्त वेळ व्यायाम केल्याने शरीर कमकुवत होते, काही वेळा वजन कमी होण्याऐवजी वजनही वाढू लागते. जास्त व्यायाम केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. शरीराची क्षमता, वजन आणि उंची लक्षात घेऊन व्यायाम केला पाहिजे.

आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा

वजन कमी करण्यासाठी काही लोकं संतुलित आहार घेतात तसेच वर्कआउटही करतात, पण तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी केवळ एक ते दोन तास शरीर सक्रिय ठेवणे पुरेसे नाही तर दिवसभर शरीर सक्रिय ठेवले पाहिजे. प्रत्येक तासानंतर चाला. जर तुम्ही डेस्कवर काम करत असाल तर प्रत्येक तासानंतर उठून चालत जा. या सोप्या क्रिया तुमच्या चयापचयाला चालना देतात आणि तुमचे वजन जलद कमी करण्यात मदत करतात.