शरीराचे तापमान संतुलित राहावे यासाठी आपल्याला घाम येत असतो. घामामुळे शरीरातील हानीकारक घटक बाहेर पडतात. पण घाम आल्याने आपल्या अंगाला दुर्गंधीदेखील येते. शिवाय घामामुळे कपडेदेखील खराब होतात. अंगाला घाणेरडा वास येत असल्यास कोणत्याही ठिकाणी जाणे आपण टाळतो. ऑफिसमधील मीटिंगमध्ये आणि लग्नसमारंभात घामाने येणाऱ्या दुर्गंधीमुळे लोकांसमोरची प्रतिमा खराब होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये ही समस्या वाढते. हा त्रास दूर व्हावा यासाठी कोणते उपाय करावेत याबाबतची माहिती आम्ही देणार आहोत.

Antiperspirants/ Deodorants वापर करा.

अँटीपर्स्पिरंट्समुळे घामाच्या नलिकांमध्ये थोड्या कालावधीसाठी अडथळा निर्माण होतो. परिणामी घाम येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच डिओडोरंट्समुळे घामाचा घाणेरडा वास नाहीसा होतो. अ‍ॅल्युमिनियम क्लोराइड किंवा झिरकोनिअम असलेल्या अँटीपर्स्पिरंट्सचा वापर करणे शरीरासाठी योग्य असते.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

स्वच्छता राखा.

शरीर स्वच्छ असल्यावर अंगाला येणारा दुर्गंध नाहीसा होतो. शरीर स्वच्छ राहावे यासाठी नियमितपणे अंघोळ करावी. साबणासह क्लीन्सरचा वापर करावा. ज्या ठिकाणी घाम येतो, असे अवयव साफ करावेत. अंघोळीनंतर शरीर कोरडे करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा.

जाड कपडे घालणे टाळा.

जाड कपड्यांमुळे जास्त घाम येतो. याउलट सुती कपडे घातल्याने घामाचे प्रमाण कमी होते. शिवाय हवेचा प्रवाह वाढल्याने घाम येत नाही. सिथेंटिक कपड्यांमुळे घामाचा ओलसरपणा टिकून राहतो. परिणामी जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते आणि दुर्गंधी यायला सुरुवात होते.

आणखी वाचा – Hyperhidrosis म्हणजे काय? या आजारामुळे एसीसमोर बसल्यावरही खूप घाम का येत असतो?

एकदा वापरलेले कपडे पुन्हा परिधान करू नका.

कपडे न धुता वापरल्याने त्यांमध्ये जिवाणूंची वाढ होऊ शकते. त्यामुळे शरीराला वास येण्याची शक्यता असते. या जिवाणूंची वाढ होऊ नये यासाठी एकदा वापरलेले कपडे सलग धुवायला टाका. एकदा घामामुळे भिजून खराब झालेले कपडे न धुता वापरू नका.

अंडरआर्म्स ट्रिम करा.

अंडरआर्मसह ज्या ठिकाणी तुम्हाला घाम येतो, तेथील केस ट्रिम करा. केसांमुळे घाम टिकून राहतो. परिणामी अंगाला वास यायला लागतो. केस कमी केल्याने दुर्गंध येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

आणखी वाचा – रडणे शरीरासाठी फायदेशीर असते का? जाणून घ्या याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…

आहाराकडे लक्ष द्या.

आहाराचा आणि शरीराला येणाऱ्या घाणेरड्या वासाचा संबंध आहे. कांदा, लसूण व अन्य मसालेदार पदार्थ खाल्ल्याने घामाचा वास तीव्र होतो. या पदार्थांऐवजी आहारामध्ये भाज्या, ताजी फळे, धान्य यांचा समावेश करावा. याशिवाय भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाणी मुबलक प्रमाणात असल्यास तीव्र-गंधयुक्त संयुगे पातळ होतात. त्यामुळे दुर्गंधीची तीव्रता कमी होण्याची शक्यता असते.