बजाज ऑटो कंपनीने आपली नवीन बाईक Bajaj CT 110 भारतात लाँच केली आहे. या बाईकच्या किक-स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 37 हजार 997 रुपये (एक्स-शोरुम) आणि सेल्फ-स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 44 हजार 352 रुपये (एक्स-शोरुम) आहे. Bajaj CT 100 पेक्षा वेगळं लूक देण्यासाठी कंपनीने नव्या बाईकमध्ये काही कॉस्मेटिक बदल केलेत.

बजाज सीटी 110 मध्ये पेट्रेलच्या टाकीवर पॅड्स आणि नवे ग्राफिक्स आहेत. बाईकचं सीट मोठ्या आकाराचं आहे. टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मिरर्ससाठी यामध्ये रबर कव्हर देण्यात आलेत. नव्या बाईकमध्ये प्लॅटिना 110 मध्ये असलेलं 115cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8.6 bhp ची ऊर्जा आणि 9.81 Nm टॉर्क जनरेट करतं. 4-स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय यामध्ये आहे. परिणामी, ही बाईक आधीपेक्षा अधिक स्मार्ट आणि पावरफुल झाल्याचा कंपनीचा दावा आहे

अद्याप या बाईकची ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी सुरू झालेली नाही, सध्या देशभरातील डिलर्सपर्यंत गाडी पोहोचवली जात असून लवकरच गाडीची डिलिव्हरी सुरू होईल. इंजिन, गिअरबॉक्स, फोर्क, व्हिल्स, हँडलबार आणि ग्रॅब-रेल्स ब्लॅक कलरमध्ये आहे. सस्पेंशनबाबत सांगायचं झाल्यास बजाजने नव्या बाईकमध्येही सीटी 100 मधील टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला ट्विन शॉर्क अॅब्जॉर्बर्स दिलेत. यात डिस्क ब्रेकचा पर्याय नाही पण एंटी-स्किड ब्रेक देण्यात आलेत. यालाच बजाजची कम्बाइंड-ब्रेकिंग सिस्टिम  म्हटलं जातं. बजाज सीटी 110 ची स्पर्धा हिरोच्या एचएफ डीलक्स आणि टीव्हीएस स्पोर्ट यांसारख्या बाईकशी असेल.