January 2023 Bank Holiday List: हे वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. थोडयाच दिवसांमध्ये नव्या वर्षाला सुरूवात. नव्या वर्षाच्या शुभ मुहूर्तावर अनेक आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक केली जाते. तुम्ही देखील अशी योजना आखत असाल, तर त्यापुर्वी जानेवारीमध्ये बँकांना किती दिवस आणि कधी सुट्टी आहे जाणून घ्या, जेणेकरून ऐनवेळी कोणतीही अडचण येणार नाही. जानेवारीमध्ये बँकांना कधी सुट्टी आहे जाणून घ्या.

जानेवारीमध्ये या दिवशी असणार बँका बंद

  • १ जानेवारी २०२३ – रविवार
  • २ जानेवारी,२०२३ – सोमवार
  • ३ जानेवारी, २०२३ – मंगळवार
  • ४ जानेवारी, २०२३ – बुधवार
  • ८ जानेवारी, २०२३ – रविवार
  • १४ जानेवारी, २०२३ – शनिवार (महिन्यातील दुसरा शनिवार)
  • १५ जानेवारी, २०२३ – रविवार
  • २२ जानेवारी, २०२३ – रविवार
  • २६ जानेवारी, २०२३ – गुरुवार
  • २८ जानेवारी, २०२३ – शनिवार (महिन्यातील चौथा शनिवार)
  • २९ जानेवारी, २०२३ – रविवार

आणखी वाचा- Ration Card: मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेपासून होणार ही सुविधा बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील काही सुट्ट्या या फक्त काही राज्यांमध्ये लागू होतील. तर देशभरातील सर्व बँका सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहतील. रिझर्व्ह बँकेकडुन प्रत्येक महिन्याला बँका कोणत्या दिवशी बंद राहणार याची यादी जाहीर केली जाते.