ऑगस्ट महिना संपत आला आहे आणि लवकरच सप्टेंबर महिना सुरु होईल. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक सणही येत आहेत. त्यामुळेच बँकेशी निगडित काही कामे असतील तर ती वेळीच पूर्ण करून घ्या. त्यासाठी तुम्ही सप्टेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहेत याची यादी पाहू शकता. या यादीच्या मदतीने तुम्ही बँकेतील कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करू शकता.

अनेक वेळा बँक महिन्यातून कोणत्या दिवशी बंद असते याची माहिती लोकांना नसते. माहितीअभावी ते बँकेत पोहोचतात आणि त्यांची महत्त्वाची कामे रखडतात. अनेक सणही सप्टेंबर महिन्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही ही समस्या टाळायची असेल, तर सप्टेंबर महिन्यात बँक कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत याची यादी एकदा तपासून घ्या.

जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यात किती दिवस बंद राहणार बँक

  • ४ सप्टेंबर – रविवार
  • १० सप्टेंबर – दुसरा शनिवार
  • ११ सप्टेंबर – रविवार
  • १८ सप्टेंबर – रविवार
  • २४ सप्टेंबर – चौथा शनिवार
  • २५ सप्टेंबर – रविवार

भारतीय रिझर्व्ह बँक लोकांच्या सोयीसाठी दर महिन्याला बँक हॉलिडे लिस्टची यादी जारी करते. मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ही यादी तपासू शकता. जर तुम्हाला बँकेतील महत्वाची कामे करायची असतील तर तुम्ही ही कामे वेळेत पूर्ण करून घ्या. यासोबतच तुम्ही हे काम नेट बँकिंग, एटीएम, डिजिटल पेमेंटच्या माध्यमातूनही ही करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.