Bank Holidays List in May 2022 : ज्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामांना सामोरे जावे लागणार आहे, त्यांनी या महिन्यात होणाऱ्या सुट्टीची यादी तपासावी. जेणे करून त्यांना बँकेच्या कामांसंबंधी येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाण्यास मदत होऊ शकेल. दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतीय बँकांची बँक हॉलिडे लिस्ट जारी करू शकते. याद्वारे ग्राहकांना बँका कोणत्या दिवशी बंद राहतील आणि कोणते दिवस उघडतील याचे अपडेट्स अगोदर मिळतात. चला तर मग या महिन्याच्या सुट्ट्यांची यादी तापासूया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट्स यांचा समावेश आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मे महिन्यापासून सलग चार दिवस बँकेला सुट्टी असेल. या सुट्ट्या राज्य आणि तिथल्या सणांनुसार बदलू शकतात. आरबीआयने चार आधारांवर बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित आहे.

मे २०२२ मध्ये बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

१ मे २०२२: कामगार दिन / महाराष्ट्र दिन.

२ मे २०२२: महर्षि परशुराम जयंती – अनेक राज्यांमध्ये सुट्टी

३ मे २०२२: ईद-उल-फित्र, बसव जयंती (कर्नाटक)

४ मे २०२२: ईद-उल-फित्र, (तेलंगणा)

८ मे २०२२: रविवार

९ मे २०२२: गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा

१४ मे २०२२: दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी

१५ मे २०२२: रविवार

१६ मे २०२२: बुध पौर्णिमा

२२ मे २०२२: रविवार

२४ मे २०२२: काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम

२८ मे २०२२: चौथ्या शनिवारी बँकांना सुटी

२९ मे २०२२: रविवार