त्वचेची निगा राखताना छोट्याछोट्या गोष्टीही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्वचेच्या स्वच्छतेसाठी बहुतेक करून साबण वापरला जातो. मात्र, आता बाजारात अनेक प्रकारच्या सुगंधी वस्तू उपलब्ध आहेत ज्यांचा वापर आंघोळीसाठी केला जातो. पण या सर्व गोष्टींमध्ये केमिकल भरलेले असते. त्यामुळे त्वचेला खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, त्वचेतून पोषण नाहीसे होते आणि आर्द्रतेची कमतरता होते.

अशा वेळी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता. यामुळे तुम्हाला पूर्ण पोषणही मिळेल आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. तुम्ही आंघोळीसाठी मुलतानी माती वापरू शकता. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमची स्वतःचे बॉडी वॉश बनवू शकता. मुलतानी माती ही एक प्रकारची औषधी माती आहे. आधुनिक काळातही त्याचा वापर आंघोळीसाठी, फेसपॅकसाठी केला जातो. त्वचा रोग बरे करण्यासाठी आणि त्वचा मुलायम ठेवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

(हे ही वाचा : तुमचे हात कोरडे पडले आहेत काय ? तर ‘या’ नैसर्गिक उपायांनी हात बनवा अधिक कोमल आणि सुंदर )

आंघोळीसाठी कशी वापरावी मुलतानी माती?

जर तुम्हाला आंघोळीसाठी मुलतानी माती वापरायची असेल तर त्यात दूध मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये हळद, चंदन किंवा गुलाब जल टाका. हा पॅक तुमच्या शरीरावर चांगला लावा. ड्राय स्किन असलेले लोक त्यांच्या मांडीला बदाम तेल, नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावू शकतात.

मुलतानी माती का वापरावी?

  • डाग दूर होतात – त्वचेवर याचा वापर केल्याने शरीरातील सर्व डाग दूर होतात. याचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ होते आणि मान, गुडघे किंवा कोपर यांच्यावरील जमा झालेले मळ दूर होण्यास मदत होते.

(हे ही वाचा : पावसाळ्यात खा ‘हे’ सुपरफुड्स, शरीर आणि त्वचा राहील निरोगी )

  • तेलकट त्वचेसाठी उत्तम – ऑइली स्किनवर नेहमी पिंपल्सची समस्या असते. मुलतानी मातीचा वापर करून त्यातून सुटका मिळते. आंघोळ करताना याचा वापर करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिक्स करा.
  • मुरूमाची समस्या दूर होणारमुलतानी माती मुरुमाची समस्या दूर करण्यास मदत करते. हे घाम, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे काम करते. हे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स देखील काढून टाकते. जादा तेलाचे उत्पादन नियंत्रित करते. छिद्र कमी करते आणि त्वचा थंड ठेवते. मुलतानी मातीमध्ये असलेले मॅग्नेशियम क्लोराईड मुरुम दूर करण्यास मदत करते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)