अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज ३ ते ४ लिटर पाणी प्यायले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. बहुतेक लोक जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेचच पाणी पितात. हे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टर सांगतात की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडिटी सारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत आणि जेवणानंतर किती वेळानंतर पाणी प्यायलं पाहिजे.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
gudi padwa 2024 gudi padwa wishes date shubh muhurat rituals puja vidhi and more
Gudi Padwa 2024 : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
Surya Shani Yuti
शनि-सूर्यदेवाची युती संपल्याने ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023
Ambedkar Jayanti 2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत
  • लठ्ठपणा वाढू शकतो.
  • पचनाच्या समस्या होऊ शकतात.
  • पोटात गॅस सारख्या समस्या असू शकतात.
  • रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

जेवणानंतर पाणी कधी प्यावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान दोन तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर किमान ४५ ते ६० मिनिटांनंतर पाणी प्यावे. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायचे असेल तर अर्धा तास आधी प्यावे.

जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी पिण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे

  • जेवणानंतर एक तासाने पाणी प्यायल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास कधीच होणार नाही.
  • जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था मजबूत होते.
  • जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्यास पोटात गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होत नाहीत.
  • खाल्ल्यानंतर शरीरात पाणी उशिरा पोहोचले की, शरीर अन्नातील पोषक तत्त्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास सक्षम होते

शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु, हिवाळ्यामध्ये लोक पाणी पिण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे देखील आपल्या शरीराला खूप त्रास होऊ शकतो.

हेही वाचा >> Copper Water: तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका ‘ही’ चूक

नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे.