Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की नाही असा अनेक जणांना पडलेला प्रश्न आहे. कांदा केवळ जेवणातच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस आणि कच्चा कांद्याचे अनेक फायदे होतात. बहुतेक घरांमध्ये कांद्याचा वापर स्वयंपाकात केला जातो, एवढेच नाही तर लोक कच्च्या कांद्याची कोशिंबीरही जेवणासोबत खातात. सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. हे सर्व मिळून कांदा एक सुपरफूड बनतो.

डोळ्याची दृष्टी सुधारते

कच्च्या कांद्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवतात. कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते कारण त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात. कांदा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे डोळ्यांची कमजोरी दूर करतात आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात.

त्वचेसाठी फायदेशीर

कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. कच्च्या कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट आढळते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते. मुरुम, डाग आणि सूज कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

हृदयासाठी फायदेशीर

फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स नावाची संयुगे कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.फ्लेव्होनॉइड्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयासाठी फायदेशीर ठरतात. त्याचवेळी, रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. अशाप्रकारे, कांद्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. कांदा खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते

कच्च्या कांद्यामध्ये क्रोमियम असते, हे खनिज रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे असते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

कर्करोगास प्रतिबंध करते

कच्च्या कांद्यामध्ये सल्फर अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतात. यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस अडथळा आणतात.

हेही वाचा >> Dark Chocolate: नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतं डार्क चॉकलेट; फायदे वाचून व्हाल

मेंदूचे कार्य सुधारते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कच्च्या कांद्यामध्ये सल्फर संयुगे असतात, ज्यामुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता पातळी सुधारते.