गौरी-गणपतीसारखे सण, उत्सव आले की अनेक घरांमध्ये घोसाळ्याच्या भज्यांचा वास घमघमू लागतो. साधारणपणे आपल्याला कांदाभजी, बटाटाभजी, पालकभजी असे भज्यांचे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये घोसाळ्याची भजीदेखील तितकीच खुमासदार लागतात. बऱ्याच वेळा घोसाळ्याची भजी खाण्यासाठी लोक नाकं मुरडतात. मात्र, घोसाळ्याची भजी किंवा भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मुळात घोसाळं हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. लघवी साफ होते.

२. कफ झाल्यास घोसाळ्याचा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन कफ बाहेर पडतो.

३. पोट साफ होतं.

४. जखम बरी होते.

५. पोटाचा घेर कमी होतो.

६.मुतखड्यावर गुणकारी

७. थकवा दूर होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.