scorecardresearch

सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात, प्रेग्नन्सी हवी किंवा टाळायची असल्यास शरीरसंबंध कधी ठेवावे?

Best Time For Sex: प्रजननक्षमता तज्ज्ञ महेश जयरामन यांनी आयुर्वेदिक व वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासाचे दाखले देत, सेक्ससाठी सर्वात उत्तम वेळ कोणती व का याविषयी माहिती दिली आहे.

Best Time To Have Sex To Get Pregnant Or Avoid Pregnancy Know From Sex Expert
सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? (फोटो: Pixabay)

Best Time To Have Sex : परिपूर्ण आणि समाधानी सेक्स-लाईफसाठी चांगले आरोग्य आवश्यक असते. विशेषतः जर आपण बाळासाठी प्रयत्न करत असाल तर आरोग्यासह अन्य काही बाबींचीसुद्धा दखल घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ. अनेक जोडपी, जी गर्भधारणेच्या हेतूने शारीरिक संबंध ठेवतात, ती दिवसभराची कामे उरकल्यावर रात्रीच्या वेळ सेक्स करतात. पण ही वेळ योग्य आहे का? प्रजननक्षमता तज्ज्ञ महेश जयरामन यांनी आयुर्वेदिक व वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासाचे दाखले देत, सेक्ससाठी सर्वात उत्तम वेळ कोणती व का याविषयी माहिती दिली आहे.

डॉ. जयरामन सांगतात की, पुरुषांमध्ये सकाळी शुक्राणूंची संख्या तुलनेने जास्त असते. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते, रात्रीच्या झोपेच्या गुणवत्तेनुसार शुक्राणूंची संख्या कमी-अधिक होऊ शकते. मात्र दिवसाच्या शेवटी जेव्हा शरीराला विश्रांतीची गरज असते तेव्हा शुक्राणूंची संख्या सर्वात कमी असू शकते.

आता यानुसार जर सेक्ससाठी सर्वोत्तम वेळ ठरविण्याचा विचार करायचा झाला तर, आयुर्वेद एखाद्या व्यक्तीचे त्री-दोष – वात, पित्त, कफ -समजून घेण्यावर भर देतो. याच बाबी एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर नियंत्रण ठेवतात.

आयुर्वेदिक डॉक्टर. दीक्षा भावसार यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी मेलाटोनिन हा विश्रांतीची इच्छा वाढवणारा हार्मोन अधिक सक्रिय असतो. तर ग्लॅम्यो हेल्थचे सह-संस्थापक डॉ. प्रीत पाल ठाकूर म्हणाले की, “प्रत्येक दोषाची दिवसातील विशिष्ट वेळ असते जेव्हा तो सर्वात जास्त सक्रिय असतो. ज्याचा लैंगिक इच्छा आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.”

तुमच्या दोषानुसार सेक्ससाठी आदर्श वेळ…

१) वात असणाऱ्या व्यक्तींसाठी, सेक्सची सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाट, जेव्हा वात ऊर्जा सर्वोच्च असते.
२) पित्त असणाऱ्या व्यक्तींना असे दिसून येईल की, त्यांची सेक्श्युअल ऊर्जा दुपारच्या उत्तरार्धात किंवा संध्याकाळी लवकर वाढते.
३) कफ असणाऱ्या व्यक्तींमध्ये संध्याकाळी उशिरा किंवा पहाटे सर्वात मजबूत लैंगिक ऊर्जा असू शकते, जेव्हा कफ ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते.”

डॉ. संतोष पांडे, रेजुआ एनर्जी सेंटर यांनी सांगितले की, सकाळचा सेक्स अधिक उत्तम असतो, कारण अनेक लोकांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. सेक्सदरम्यान एंडोर्फिन आणि डोपामाइन शरीरात सक्रिय होतात, ज्यामुळे मूड चांगला राहतो त्यामुळे जर का तुम्हाला दिवसाची सुरुवात उत्तम एनर्जीसह करायची असेल तर सकाळची वेळ सेक्ससाठी बेस्ट आहे.

हे ही वाचा<< सेक्सनंतर अचानक दुःखी, अस्वस्थ का वाटते? तज्ज्ञांनी सांगितलं शरीराचं गुपित, करून पाहा हे उपाय

डॉ. ठाकूर यांच्या मते, आयुर्वेद लैंगिक ऊर्जेला मानवी जीवनातील एक महत्त्वाचा आणि पवित्र पैलू मानतो. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःचे शरीर आणि गरजा, तसेच जोडीदाराच्या गरजांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. एखाद्याचा दोष समजून घेण्यासह आयुर्वेद एकंदर शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्याच्या महत्त्वावरही भर देतो. यामध्ये संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि पुरेशी शांत झोप घेणे यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 10:56 IST
ताज्या बातम्या