Why Do I Feel Sad After Sex: सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी ही अनेक भावभावनांचे मिश्रण असते. अनेकदा सेक्सच्या आधी व नंतर तुम्हाला याच भावना नेमक्या कोणत्या आहेत हे ओळखण्यात गोंधळ होऊ शकतो. अनेक कपल्सने आजवर शेअर केलेल्या अनुभवांनुसार त्यांना सेक्सनंतर विशेषतः दुःखी, चिंतीत किंवा अस्वस्थ वाटते. याला वैद्यकीय भाषेत, पोस्ट-कोइटल डिसफोरिया किंवा पोस्ट- सेक्स ब्ल्यूज असेही म्हणतात. असे वाटण्यामागे नेमके कारण काय याविषयी स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ञ डॉ. जागृति वार्ष्णेय यांनी माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात की, पोस्ट- सेक्स ब्ल्यूजमध्ये विशेष असे की दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांच्या संमतीने सेक्स केल्यानंतरही अस्वस्थता जाणवू शकते. याचा संबंध सेक्स करण्यास असमर्थ असण्याशी नाही किंवा तुम्हाला एकूण प्रक्रियेत सुख, आनंद मिळालाच नाही असेही नाही. उलट पूर्ण सेक्श्युअल प्रक्रियेचा आनंद घेतल्यावर तुम्हाला अधिक अस्वस्थ व तणावग्रस्त वाटू शकते. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF तज्ज्ञ डॉ युवराज जडेजा यांनी पोस्ट-कोइटल डिसफोरियाची संभाव्य कारणे एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितली आहेत. लैंगिक अत्याचाराचा अनुभव असणेसामान्य चिंता आणि तणावहार्मोन्ससेक्स बद्दल तुमच्या समजुती- गैरसमजुतीशरीराबाबत न्यूनगंडनात्यातील समस्या जर आपणही सेक्सनंतर असा अनुभव घेतला असेल किंवा भविष्यातही अशी कधी वेळ आलीच तर अशावेळी काय करावे यासंदर्भात डॉ. जडेजा यांनी मार्गदर्शन केले आहे. सर्वात आधी शरीराला नियंत्रणात आणणे गरजेचे असते त्यामुळे सेक्सनंतर श्वासोच्छवास संतुलित करण्याकडे लक्ष द्या. हळू श्वास घ्या- हळु श्वास सोडा.स्वतःला शांतपणे खालील तीन प्रश्न विचारा :मी सुरक्षित आहे का?सध्या काय होत आहे?मला आता या वेळी काय हवे आहे? त्याच वेळी, जर तुमच्या जोडीदाराला लैंगिक संबंधानंतर चिंता वाटत असेल, तर त्यांना याबद्दल बोलायचे आहे का ते विचारा, त्यांनी होकार दिल्यास ऐकून घ्या व नकार दिल्यास त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. हे ही वाचा<< वयानुसार महिलांना किती Sex ची गरज असते? एका महिन्यात किती वेळा संबंध ठेवावे? डॉ वार्ष्णेय म्हणाले की, “पोस्ट-कोइटल डिसफोरियासाठी मदत घेण्यास कोणताही संकोच मनात ठेवू नका. तुमच्या जोडीदाराशी तुमच्या गरजांबद्दल संवाद साधणे हा यासाठी बेस्ट उपाय ठरतो पण तुम्हाला दोघांनाही दिशा सापडत नसल्यास तज्ज्ञांची भेट घ्या. तुमचे शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाटःई ध्यान आणि योग यासारखे बदल जीवनशैलीत करू शकता.