सध्या सुपारीला अनेकजण फक्त माऊथ फ्रेशनरच्या स्वरूपात खातात. पण आयुर्वेदात सुपारीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. आरोग्यासाठी सुपारी फायदेशीर मानली जाते. याचा वापर घरगुती उपचार आणि अनेक प्रकारची औषधं बनवण्यासाठी केला जातो. सुपारी कोणकोणत्या प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते जाणून घ्या
सुपारीचे फायदे
दाताचे दुखणे, तोंडाचा अल्सर यासाठी सुपारी वरदान मानली जाते
सुपारीमध्ये असे अनेक घटक आढळतात जे दाताचे दुखणे कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय तोंडात येणारे फोडांवर सुपारी फायदेशीर मानली जाते. याशिवाय तोंडाच्या अल्सरवरही सूपारी फायदेशीर मानली जाते.
उल्टीचा त्रास
जर सतत उल्टीचा त्रास होत असेल तर सुपारी आणि थोडी हळदीच्या मिश्रणाला साखरेत मिसळून घ्या. यामुळे उल्टीचा त्रास कमी होईल.
पोटाचे विकार
पोटाच्या विकारांपासून सुटका मिळवण्यासाठीही सुपारी फायदेशीर मानली जाते. सुपारी शरीरातील टोक्सिन काढून टाकण्यास मदत करते. यामुळे आतडयांशी निगडित समस्यांशी सुटका मिळवण्यासही मदत होते.
युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन
सुपारी आणि मधाचा काढा युरीनरी ट्रॅक इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर मानला जातो.