Can we drink cardamom water daily : बिग बॉस १९ या शोचा प्रवास जसा पुढे जातो आहे तसतसं रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. तर अनेकदा बिग बॉसच्या शो दरम्यान भांडणे होत असली तरीही काही अभिनेत्री, प्रसिद्ध इन्फ्लुएंसर त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या केस आणि चेहऱ्याच्या सौंदर्येबद्दल रहस्य आवर्जून सांगतात दिसतात तर अलीकडेचा एक क्षण असा होता जेव्हीज तान्या मित्तल, अमल मलिकला वेलचीयुक्त पाणी देत होती; तिच्या म्हणण्यानुसार साध्या कृतीमुळे या साध्या पेयाच्या आरोग्य फायद्यांबद्दल बिग बॉसच्या घरात चर्चा सुरू झाली आहे.

एका विकेंडच्या भागात, तान्याने सांगितले की, ती अमलसाठी वेलचीयुक्त पाणी बनवणार आहे. तिने कॅमेऱ्यासमोर असेही म्हटले की, त्यासाठी ती आपल्या गावी ग्वाल्हेरला ही जाऊ शकते. दररोज वेलचीचे पाणी पिणे तुमच्यासाठी आरोग्यासाठी फायदेही आहे का ? हे जाणून घेण्यासाठी बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

वेलचीला कोमट पाण्यात भिजवल्यानंतर ते एक “जादूई पेय” बनते. मग पचन सुधारण्यासाठी, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, श्वसनाच्या तक्रारी कमी करण्यासाठी आणि त्वचेची चमक वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

पचनक्रिया सुधारते – वेलचीचे पाणी पोटफुगी, गॅस किंवा अपचन कमी करण्यास मदत करते. हा मसाला पित्त आम्ल उत्पादन वाढवतो, ज्यामुळे अन्नाचे विघटन होण्यास मदत होते.

तोंडासाठी फायदेशीर – वेलचीमध्ये असणाऱ्या जंतुनाशक गुणधर्मांमुळे तोंडातील जंतू नष्ट होतात, दुर्गंधी कमी होते आणि तोंडाचे आरोग्य टिकून राहते.

हृदयाचे आरोग्य सुधारते – अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियमने समृद्ध असलेले, वेलचीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (ताण) कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.

श्वसनास आधार – वेलचीचे पेय कफ साफ करण्यास, नाकातील रक्तसंचय कमी करण्यास आणि फुफ्फुसांच्या आरोग्यास मदत करतात; त्यामुळे असा दावा केला जातो आहे की, दमा किंवा ब्राँकायटिस असलेल्यांसाठी हे संभाव्यतः फायदेशीर आहे.

त्वचेचे फायदे – वेलचीचे पाणी त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे लवकर वृद्धत्व येण्याची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात; यामुळे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवू शकते आणि चेहऱ्याची चमक वाढवू शकते.

वेलचीच्या पाण्याचे सेवन कधी करावे?

पाणी थोडे गरम करा, त्यात काही हिरव्या वेलचीच्या फोडी घाला, काही मिनिटे भिजू द्या, नंतर हळूहळू प्यायला सुरुवात करा. जेवणाच्या दरम्यान किंवा सकाळी पहिल्यांदा प्यायल्यास ते उत्तम काम करते. (अर्थात, जर तुम्हाला आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही गर्भवती असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.)