Walking vs yoga: Which is better for blood sugar control? ब्लडप्रेशर ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. पण, ब्लडप्रेशरची लेव्हल नियंत्रित करणाऱ्या आहारासोबतच व्यायामही महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन हे फक्त तुम्ही काय खाता यावर नाही, तर तुम्ही शरीराची कशा प्रकारे हालचाल करता, शरीराला कसे सक्रिय ठेवता यावरही अवलंबून आहे. मधुमेह किंवा प्री-डायबेटीस असलेल्या लोकांसाठी शिफारस केलेल्या शारीरिक हालचालींपैकी चालणे आणि योग या दोन आहेत. दोन्हीही महत्त्वाचे आरोग्य फायदे देतात; परंतु जेव्हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी काय फायदेशीर आहे जाणून घेऊयात.
चालणे हा एक सरळ अॅरोबिक व्यायाम आहे, जो इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतो आणि रक्तातील ग्लुकोज कमी करतो, विशेषतः जेवणानंतर. दुसरीकडे योगामध्ये हालचाली, श्वासोच्छ्वास आणि विश्रांती तंत्रांसह एकत्रित केल्या जातात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रक्तातील साखरेतील ताण-संबंधित वाढ कमी होऊ शकते. दोन्ही पद्धती निरोगी असल्या तरी त्यांचा ग्लुकोजच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे समजून घेतल्यास लोकांना सर्वांत प्रभावी पर्याय निवडण्यास मदत होऊ शकते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी विशेषतः टाईप २ मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांसाठी चालणे की योगा काय फायदेशीर
ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे योग्य की व्यायाम करणं?
मधुमेह शिक्षक, सल्लागार व आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा indianexpress.com ला सांगतात, “मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यावर चालणे आणि योग दोन्ही खूप फायदेशीर ठरू शकतात. मात्र, योग जास्त फायदेशीर ठरू शकतो.”
त्या पुढे म्हणतात, “चालण्याच्या तुलनेत, योगामुळे उपवासाने रक्तातील साखर आणि HbA1c कमी होऊ शकते. योगामुळे इन्सुलिन संवेदनशीलताही वाढू शकते आणि स्वादुपिंडाचे कार्य सुधारू शकते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. योग म्हणजे हलका व्यायाम, खोल श्वास घेणे व तणाव कमी करणे, जे या सर्वांना एकत्रितपणे रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास आणि सर्वसाधारणपणे चयापचय आरोग्यास हातभार लावण्यास मदत करते. चालणे स्नायूंद्वारे ग्लुकोजचे सेवन वाढवते; परंतु जेव्हा तुम्हाला मधुमेह असतो, तेव्हा तुमच्या क्रियाकलापांमध्ये योगाचा समावेश केल्याने तुमचे शरीर ग्लुकोजचे चांगले व्यवस्थापन करण्यास आणि दीर्घकाळात निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करेल.”
वेळेचे महत्त्व
योग आणि चालणे जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. “जेवणानंतर ३०-४५ मिनिटे चालणे चांगले. कारण- त्यावेळी रक्तातील ग्लुकोजची पातळी जास्तीत जास्त असते. १० मिनिटे अल्पकालीन चालणे ठीक आहे; परंतु दीर्घकालीन परिणामांवर ३० मिनिटे चालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चालणे केवळ स्नायूंमध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढवत नाही, तर व्यायामानंतर २४ तासांनीही इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते,” असे मल्होत्रा शिफारस करतात.
जेवणानंतर नियमितपणे योगाभ्यास केल्याने जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. मल्होत्रा पुढे म्हणतात, “योगाचे परिणाम स्वादुपिंडावर आणि तणाव संप्रेरकांवर होऊ शकतात, ज्यामुळे रक्तातील साखर स्थिर होते. जेवणानंतर दोन्ही क्रियाकलाप एकत्रित करण्याचे फायदे टाईप २ मधुमेहात जास्तीत जास्त होतात.”