scorecardresearch

विकी कौशल घेतोय ‘ब्राझिलियन मार्शल आर्ट’ आणि ‘गिंगा कॅपोइरा’चं खास प्रशिक्षण

विकी कौशलने इन्स्टाग्रामला ट्रेनरसोबत प्रशिक्षण घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे

विकी कौशल घेतोय ‘ब्राझिलियन मार्शल आर्ट’ आणि ‘गिंगा कॅपोइरा’चं खास प्रशिक्षण
अभिनेता विकी कौशलने आपल्या ट्रेनरकडून गिंगा कॅपोइरा शिकत असताना डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता विकी कौशलने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विकी कौशल “ब्राझिलियन मार्शल आर्ट आणि  ‘गिंगा कॅपोइरा’ मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे. हा नृत्य आणि संगीताच्या आधारे शिकला जाणारा मार्शल आर्टचा प्रकार आहे. अभिनेता विकी कौशलने आपल्या ट्रेनरकडून ‘गिंगा कॅपोइरा’ शिकत असताना डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी विकी कौशल खास स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

विकी कौशलने इंस्टाग्रामला हा व्हिडिओ शेअर केला असून ‘उठा आणि शिका’ अशी कॅप्शन दिली आहे. तसंच सोबत #Ginga #Capoeira #6am हॅशटॅग दिले आहेत.

दरम्यान विकी कौशलच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास तो सध्या मेघना गुलजार दिग्दर्शन करत असलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या आयुष्यावर आधारित “सॅम बहादुर” या चित्रपटात दिसणार आहे. तसंच सुजीत सरकारच्या “सरदार उधम सिंह” या बायोपिकमध्येही विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच “मिस्टर लेले” या चित्रपटात विकी कौशलची विनोदी  भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या