Premium

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कुणास अधिक असते? जाणून घ्या

Breast Cancer Awareness, Symptoms & Treatment: स्तनाच्या कर्करोगची चाचणी तसेच, स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कुणास अधिक असते? हे जाणून घ्या तज्ञांकडून.

Breast cancer symptoms, treatment & awareness
(फोटो: Freepik)

Breast Cancer Latest News: अभिनेत्री महिमा चौधरीने तिच्या स्तनाच्या कर्करोगबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरीची केमोथेरपी झाली, त्यामुळे तिचे सर्व केस गळले आहेत. अभिनेता अनुपम खेर यांनी महिमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्तनाच्या कर्करोगबद्दल सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे स्तनाच्या कर्करोगबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. अजूनही अनेकांना स्तनाच्या कर्करोगबद्दल माहिती नाही. स्तनाच्या कर्करोगची चाचणी तसेच, स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कुणास अधिक असते? हे जाणून घ्या तज्ञांकडून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅमोग्राफी

ही तपासणी सर्व ठिकाणी चíचली जाते. त्याबद्दल आपण जागरूक असणे महत्त्वाचे आहे. ही स्तनाच्या कर्करोगासंबंधित वा इतर आजारांसंबंधित केली जाते. यात यंत्राद्वारे स्तनांवर दाब देऊन आलेख काढून छायाचित्रे घेतली जातात. ज्यांच्या स्तनांचा आकार अधिक आहे त्यांच्याबाबतीत ही तपासणी करून निष्कर्षांपर्यंत येणे कठीण असते. मॅमोग्राफी तपासणीनंतर काढल्या गेलेल्या निष्कर्षांत १० ते १५ टक्के चूक होऊ शकते. म्हणूनच मॅमोग्राफी व स्तनांची तज्ज्ञांद्वारे तपासणी यांची जोड असावी. साधारण वयाच्या चाळीसाव्या वर्षांपासून ६५ ते ७० वर्षांपर्यंत मॅमोग्राफी करून घ्यावी. ४०व्या वर्षांच्या तपासणीत काही आढळले नाही तर दोन वर्षांनंतर तपासणी करून घ्यावी. या मॅमोग्राफीचा निष्कर्ष आपल्याला BI- RADS (बी.आय.आर.ए.डी. एस.) याखाली पाहता येते. यात चार प्रकार येतात.

 • स्तनाच्या तपासणीत सर्व काही योग्य आहे.
 • दुसरा प्रकार म्हणजे थोडेसे बदल असल्यास कर्करोग नक्कीच नाही, स्तनातील इतर गाठी, पण त्याची नोंद ठेवून परत तपासणी आवश्यक.
 • स्तनातील गाठींचा तुकडा तपासणीसाठी आवश्यक व अतिदक्षतेने उपचार करावा अशी नोंद दिली जाते.
 • स्तनाच्या गाठींमध्ये कर्करोग आहे त्याचा इलाज लवकरात लवकर करावा.

(हे ही वाचा: Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगबद्दल असलेली ‘ही’ मिथक आणि तथ्य जाणून घ्या)

स्तनाच्या गाठीतील कर्करोगाचे निदान आधीच असले तरी त्याचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये म्हणून त्वरित उपचार करावेत. स्तनतपासणीत स्तनाग्रांचा आकार, त्यांचा दर्शनी भाग, त्यातून येणारा द्रवपदार्थ हा कोणत्या रंगाचा आहे, किती प्रमाणात आहे, त्याचबरोबर आजूबाजूची त्वचा कशी आहे, काखेत गाठी असल्यास त्यांची तपासणी या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. मॅमोग्राफीप्रमाणेच मॅमोसोनोग्राफी व एमआरआय या तपासणीतून अधिक माहिती मिळते. अल्ट्रासोनोग्राफीच्या मदतीने घेतलेली फाइन नीडल बायोप्सी ही निदानासाठी उपयुक्त ठरते. एखाद्या बारीक तुकडय़ावरून सर्वसाधारण निदान होते. स्टिरिओस्टॅटिक बायोप्सी ही जेव्हा हातास गाठ लागत नाही, परंतु स्तनाच्या मॅमोग्राफीमध्ये काहीतरी संशयास्पद आहे असे समजल्यास केली जाते.

कर्करोगाची शक्यता कुणास अधिक असते?

 • आनुवंशिकतेनुसार आईला कर्करोग (स्तनाचा) झाला असेल तर मुलीला हा आजार होण्याची शक्यता ५ ते १० टक्के असते.
 • एखाद्या स्त्रीच्या एका स्तनास कर्करोग होऊन उपचार केले असतील तर दुसऱ्या स्तनास त्याचा प्रादुर्भाव काही वर्षांनी जाणवू शकतो.
 • ज्या स्त्रियांना वयाच्या १२ व्या वर्षांआधी मासिक पाळी सुरू होते वा ज्या स्त्रियांना रजोनिवृत्ती (मासिक पाळी बंद होणे) वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत होते, तसेच ज्या स्त्रियांना एकही मूल झाले नाही अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
 • मुलांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग उद्भवण्याची शक्यता कमी असते.
 • काही कारणास्तव दोन्ही अंडकोश काढून टाकले असतील तर त्या महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्स

 • रिप्लेसमेंट थेरपी १० वर्षांच्या कालावधीपर्यंत घेत असलेल्या स्त्रियांना कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 • काही कर्करोगांवरील उपचार म्हणून खूप कालावधीपर्यंत क्ष-किरण घेतलेल्या स्त्रियांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
 • मादकद्रव्य सेवन, जंकफूड यांचा विचार स्तनाच्या कर्करोगासंबधित करायला हवा.

स्तनाच्या कर्करोगासंबंधित जेव्हा जेव्हा तपासण्या होतात तेव्हा वरील कारणांकडे लक्ष जरूर द्यायला हवे. मात्र ही कारणे नसतील तर स्तनाच्या कर्करोगाच्या निदानाव्यतिरिक्त स्तनाचे इतर आजारही होऊ शकतात.

 • स्तनाच्या वाढीतील पाण्यासारख्या गाठी (Fibrocystic disease)
 • स्तनाच्या आत झालेली मांसल वाढ (Fibroadenoma)
 • स्तनाच्या पेशीतील बदल (Mastitis)
 • स्तनाग्रापर्यंत येणाऱ्या नलिकासंदर्भात (Duct-ectasia)
 • स्तनावरील रक्तवाहिन्यांचा दाह (Superficial Thrombophlebitis)
 • स्तनाच्या पेशीतील बिघाड (Fat Necrosis)
 • स्तनाग्रातून बाहेर पाझरणारा द्रव (Nipple discharge) याचा रंग, प्रवाहीपण, दृश्यस्वरूप महत्त्वाचे ठरते.
 • स्तनातील गाठी (Galactocele) या गाठीसाठी एक द्रव्य घालून आलेख काढला जातो याला Galacrography म्हणतात.

(मूळ लेख डॉ. रश्मी फडणवीस (rashmifadnavis46@gmail.com) यांनी लिहलेला आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Breast cancer awareness symptoms treatment ttg

First published on: 09-06-2022 at 18:15 IST
Next Story
११ ते २६ जून दरम्यान सहा दिवस बँका राहणार बंद; महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या