यकृताच्या कर्करोगावर ब्रोकोली उपयुक्त

आहारात जर ब्रोकोलीचा समावेश असेल तर यकृताच्या कर्करोगापासून संरक्षण

ब्रोकोली

आहारात जर ब्रोकोलीचा समावेश असेल तर यकृताच्या कर्करोगापासून संरक्षणाबरोबरच यकृताची चरबीयुक्त अतिरिक्त वाढही रोखण्यास मदत होत असल्याचा दावा नव्या संशोधनानंतर केला गेला आहे.

संशोधकांच्या मते, आठवडय़ातून तीन ते चार वेळा ब्रोकोलीचे सेवन आहारातून केल्यास स्तनाचा, प्रोस्टेट (मूत्राशयाचा निमुळता भागावर असणारी ग्रंथी) आणि मोठय़ा आतडय़ांसारखे कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी असते.

रोजच्या आहारातील ब्रोकोलीच्या सेवनामुळे यकृताचा कर्करोग बळावत नसल्याचे नव संशोधनात सिद्ध झाले आहे. तसेच यकृताची चरबीयुक्त वाढ किंवा मद्यसेवन नसतानाही यकृताची होणारी वाढ (एनएएफएलडी) आणि त्यातून पूढे यकृतात होणारा बिघाडामुळे सर्वात जास्त मृत्यू होण्याचे प्रमाण असलेल्या यकृतातील पेशीचा कार्सिनोमा(एचसीसी) सारखा आजारदेखील बळावत नसल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकेतील ल्लिइनोइस विद्यापीठाच्या इलिजाबेथ जेफरी यांच्या म्हणण्यानुसार,  ब्रोकोलीमुळे कर्करोगावर नियंत्रण मिळविता येते.  अति-प्रमाणातील चरबीयुक्त व साखरमिश्रित आहार आणि शरिरातील अतिरिक्त चरबीची वाढ यांचा संबंध हा एनएएफएलडीच्या वाढीस पोषक असून त्यामुळेच सिरोसिस आणि यकृताचा कर्करोगांसारखे आजार बळावत असतात. यावेळी संशोधकांनी यकृताचा कर्करोगाला अनुरूप आहारासोबत ब्रोकोलीचा आहार उंदराला दिला. त्यासाठी चार उंदराचे विविध गटांमध्ये परीक्षण केले गेले. त्यापैकी काहींना अतिशय नियंत्रित आहार किंवा पाश्चिमात्य आहार आणि काहींना ब्रोकोलीयुक्त किंवा ब्रोकोलीविरहीत आहार देताना यकृताची वाढ जास्त किंवा कमी यांची पडताळणी करण्यात आली. यावेळी संशोधकांनी यकृताच्याकर्करोगाला अनुरूप अशा पाश्चिमात्य आहारासोबत न्यूडल्स दिल्यानंतर यकृताचा आकार वाढल्याचे दिसून आले आणि जेव्हा आहारात ब्रोकोलीचा समावेश करताना न्यूडल्सची संख्या कमी करण्यात आली, तेव्हा मात्र यकृताचा आकारात कोणतीही वाढ झाली नसल्याचे दिसून आले. यांचाच अर्थ असा की, आहारातील ब्रोकोलीच्या समावेशामुळे यकृतातील अतिरिक्त चरबीयुक्त वाढ थांबली असून यकृतातून बाहेर पडणाऱ्या चरबीलाही नियंत्रित ठेवले जाते.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Broccoli helpful for liver cancer

ताज्या बातम्या