ब्रेस्ट कॅन्सरबाबत महिला आणि मुलींच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. याआधीही तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रा संबंधित अनेक अफवा ऐकल्या असतील. तुम्ही ऐकलेल्या काही अफवा तुम्हाला खऱ्या देखील वाटल्या असतील. कारण काही वेळा योग्य माहिती नसल्यामुळे मनात शंका राहतात. स्तनांशी संबंधित समस्यांबद्दल आपण ऐकतो आणि मनात विचार येतो की आपण घातलेली ब्रा ब्रेस्ट कॅन्सरचे कारण बनू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, काळ्या रंगाची ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. अशा मेसेजमुळे अनेक महिलांनी काळी ब्रा घालणे बंद केले. याव्यतिरिक्त असाही दावा केला जातोय की, सूर्याची किरणे थेट स्तनांवर पडल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो त्यामुळे उन्हात बाहेर जाण्यापूर्वी तुमचे स्तन ओढणीने किंवा इतर कोणत्याही कपड्याने झाकले पाहिजेत. पण या प्रकरणात किती तथ्य आहे ते डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

( हे ही वाचा: Hair Wash Periods: मासिकपाळी दरम्यान महिला केस धुवू शकतात का? जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)

डॉक्टरांच्या मते ही केवळ अफवा आहे. खरं तर, ब्रा च्या रंगामुळे तुम्हाला स्तनाचा कर्करोग होईल की नाही याने काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या रंगाची ब्रा घालायची आहे ती तुम्ही घालू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रा आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी बोलताना डॉ. तान्या म्हणाल्या, “काळ्या रंगाची किंवा गडद रंगाची ब्रा घातल्याने तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? अनेकदा तुम्ही हे ऐकले असेल आणि इतरांना सांगितले असेल की काळी ब्रा घातल्याने तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो; कारण तुमचे स्तन उष्णता शोषून घेतात कारण काळा रंग उष्णता शोषून घेणारा रंग आहे. त्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.”

डॉ. तान्या पुढे म्हणाल्या, “तुमचे स्तन मॅक्रोवेबमध्ये बंद केलेले नाहीत, ते इतर कोणत्यातरी गोष्टींशी जोडलेले आहेत. काळी ब्रा किंवा गडद रंगाची ब्रा तुम्हाला कोणत्याही प्रकारे स्तनाचा कर्करोग होऊ देत नाही, त्यामुळे अशा मिथकांकडे लक्ष देऊ नका. मात्र, हे खरंय की, योग्य आकाराची ब्रा न घातल्याने स्तन दुखू शकतात. त्याच वेळी, ब्रा निवडताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवत नाही ज्यामुळे स्तनांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

( हे ही वाचा: Garlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे ठरेल वरदान; तज्ञांच्या मते याचे सेवन केल्यास ‘हे’ आजार कधीही होणार नाहीत)

ब्रा घालून झोपणे किंवा बराच वेळ घालून ठेवणे

बर्‍याच स्त्रिया झोपताना ब्रा घालत नाहीत. महिलांच्या समजानुसार ब्रा मध्ये झोपल्याने छिद्रांना श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे घाम साचतो आणि विषारी द्रव्ये तयार होतात जी स्तनाच्या कर्करोगाचे कारक म्हणून ओळखली जातात. बराच वेळ घट्ट ब्रा घालण्याबाबतही हाच विचार सुरू आहे. मात्र, स्तन शल्यचिकित्सक आणि कर्करोग संस्थांनी हे समज खोडून काढले आहे. तसंच, ते खूप घट्ट असलेल्या ब्रा न घालण्याची शिफारस करतात, कारण यामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटू शकते, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

ब्रेस्ट कॅन्सरचे (Breast Cancer) जोखीम घटक

  • ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे ६५% महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे, कारण ९९% महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वयानुसार वाढते.
  • वयाच्या चाळीशी नंतर, गोरी त्वचा असलेल्या महिलांमध्ये कोरडी त्वचा असलेल्या लोकांपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
  • काही अनुवांशिक जनुक उत्परिवर्तन आहेत ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. अशी समस्या फक्त ५ ते १० टक्के प्रकरणांमध्ये दिसून येते.

( हे ही वाचा: पाठीच्या ‘या’ भागात दुखणे ठरू शकते हृदयविकाराच्या झटक्याचे कारण; जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)

  • तुम्हाला याआधी स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर तो पुन्हा होऊ शकतो, कारण स्तनाच्या काही असामान्य पेशी आहेत ज्यामुळे पुन्हा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
  • ज्या स्त्रिया दररोज २ ग्लास (अल्कोहोल) पितात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका २१% जास्त असतो. याशिवाय, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे रजोनिवृत्तीनंतर स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढु शकतो.
  • मासिक पाळीची सुरू झाल्यावर १२ वर्षाआधी झाल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, रजोनिवृत्ती वयाच्या ५५ वर्षांनंतर आल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can wearing black bra cause breast cancer know what is the truth from experts gps
First published on: 10-10-2022 at 15:31 IST