Know the symptoms of melanoma skin cancer: महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा एक भयानक आजार बनला आहे आणि जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर त्यामुळे महिलांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांची संख्या वाढत आहे. स्तनाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा स्तनात जास्त पेशी तयार होऊ लागतात आणि तेथून पेशी नंतर गाठीचे रूप धारण करतात, ज्यामुळे महिला स्तनाच्या कर्करोगासारख्या भयानक आणि गंभीर आजाराला बळी पडतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये खराब जीवनशैली आणि खराब आहार यांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, त्वचेवर तीळ असल्याने महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगदेखील होऊ शकतो. चला जाणून घेऊया स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी तीळ खरोखर जबाबदार आहेत का…

तुमच्या त्वचेवर तीळ आहे का? तीळ हा सुंदरतेचं प्रतीक म्हणून सगळ्यांनाच आवडत असतो. जर तुमच्या त्वचेवर तीळ दिसत असेल, तर तो त्वचा कर्करोगाचं कारणसुद्धा असू शकतो. त्यामुळे त्वचेची तपासणी करणं गरजेचं आहे. तीळ आणि मेलेनोमा कॅन्सर यामध्ये एक धूसर रेषेचा फरक असतो. अनेकदा त्वचा कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार वाढत जातो.

तीळ आणि स्तनाच्या कर्करोगाचा संबंध

स्तनाच्या कर्करोगावरील अनेक अभ्यासांतून असे सिद्ध झाले आहे की, ज्या महिलांच्या शरीरावर सामान्यतेपेक्षा जास्त तीळ असतात, त्यांना रजोनिवृत्तीपूर्व स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. त्याशिवाय फ्रान्समध्ये सुमारे ८९,९०२ महिलांवर तिळांबाबत संशोधन करण्यात आले. त्या संशोधनामध्ये सुमारे ५,९५६ महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. दुसरीकडे, ज्या महिलांच्या शरीरावर तीळ कमी होते, त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी असल्याचे आढळून आले.

स्तनाच्या कर्करोगाचे तीळ असे दिसतात

कर्करोग तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या शरीरावर जे तीळ असतात, ते नंतर कित्येकदा स्तनाच्या कर्करोगाचे कारण ठरतात. हे तीळ सामान्य तिळांपेक्षा काहीसे वेगळे असतात. त्यामुळे हे तीळ ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. कर्करोगकारक तीळ सामान्य तिळांपेक्षा कसे वेगळे आहेत आणि ते तीळ ओळखून हा गंभीर आजार कसा टाळता येईल ते जाणून घेऊया.

आकार : कृपया हे लक्षात घ्या की, कर्करोगाच्या तिळाचा आकार सामान्य तिळापेक्षा वेगळा असू शकतो.

रंग : अनेक अभ्यासांनुसार, कर्करोगाचे तीळ अनेक रंगांमध्ये आढळले आहेत. ते मुख्यत: हलका गुलाबी, काळा, पांढरा व राखाडी, अशा रंगांमध्ये आढळून आले आहेत.

बदल : बऱ्याचदा कर्करोगाचे तीळ काही काळानंतर बदलतात. काही आठवडे किंवा महिन्यांनंतर ते मागील तिळांपेक्षा वेगळे दिसू लागतात.

जर तुमच्या शरीरातील काही भागांवर तीळ असेल, तर त्या ठिकाणी सूज येणे, त्या भागाचा आकार वाढणे, असे बदल जाणवत असतील, तर तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कारण- ही लक्षणं त्वचेवर होत असलेल्या मेलानोमा कर्करोगाची असू शकतात. सामान्य तीळ वेदनादायक नसतो. तुम्ही त्या भागावर कितीही दाबलं तरी त्यामुळे वेदना होणार नाहीत. पण, जर तीळ असलेल्या ठिकाणी तुम्हाला खाज किंवा सूज आली असेल, तर ते मेलानोमा कर्करोगाचं लक्षणं असू शकतं. त्यामुळे योग्य वेळीच तपासणी करून घ्या.