How To Keep Chapati Dough Fresh For Long: जेवणात डाळ, भात, भाजीबरोबर चपाती किंवा फुलका तितकाच महत्त्वाचा पदार्थ असतो. चपातीशिवाय अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे काहींना रोज दुपारी किंवा रात्री जेवणात एक तरी चपाती हवी असते. काही वेळा चपातीचे पीठ मळण्यासाठी वेळ नसतो म्हणून एकदाच जास्त पीठ मळून ठेवले जाते. पण, हे जास्तीचे मळलेले पीठ जर नीट स्टोअर करून ठेवले नाही, तर ते खराब होण्याची भीती असते. अशा वेळी कधी कधी स्टोअर केलेले पीठ काळे पडते. त्याशिवाय त्याच्या चपात्याही घट्ट होतात. जर तुम्हालाही अशीच समस्या जाणवत असेल, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही साध्या आणि सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्याच्या मदतीने तुम्ही पीठ जास्त दिवस ताजे ठेवू शकता.
चपातीचे मळलेले पीठ जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी वापरा ”या’ टिप्स :
१) पीठ खूप ओले करून ठेवू नका
चपातीचे मळलेले पीठ जास्त काळ ताजे ठेवायचे असेल, तर पीठ मळताना जास्त पाणी वापरू नका. जास्त पाण्यामुळे पीठ लवकर खराब होऊ शकते. त्याशिवाय पीठ लवकर काळे पडते.
२) तूपाचा करा वापर
पीठ जास्त दिवस स्टोर करुन ठेवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करु शकता. तूपामुळे पीठ जास्तवेळ ताजे राहते.
३) हवाबंद डब्यात ठेवा
पीठ जास्त दिवस साठवण्यासाठी तुम्ही हवाबंद डब्याचा वापर करू शकता. उरलेले पीठ तुम्ही हवाबंद डब्यात बंद करून फ्रिजरमध्ये ठेवू शकता. त्यामुळे पीठ ताजे राहील.
४) फॉइल पेपर वापरा
पीठ जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी तुम्ही फॉइल पेपर वापरू शकता. पीठ फॉइल पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजरमध्ये ठेवल्यास, ते लवकर खराब होणार नाही.