रक्षाबंधन, गणपतीमध्ये भटंकतीचा विचार?; जाणून घ्या कोणत्या राज्यात करोनासंदर्भात काय आहेत नियम

सणांच्या दरम्यान कुठेहीचं बाहेरगावी जाण्याचं नियोजन करण्यापूर्वी कोणत्या राज्यात कोणते नियम केले गेले आहेत ते जाणून घेण महत्त्वाचं आहे.

Check states that need RT PCR report or vaccine certificate before travelling for festivals
सुट्ट्यांमुळे फिरायला जायचं नियोजन हमखास केलं जात (प्रातिनिधिक फोटो)

कोरोनाव्हायरस संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या भीती दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून देशात अनेक सण येत आहेत. गणेश चतुर्थी, रक्षाबंधन हे सण या महिन्यात देशभरात साजरे केले जातील. सण म्हटलं की सेलिब्रेशन आलं आणि त्यासाठी अनेकजण नातेवाईकांना भेटायला किंवा या दिवशी असणाऱ्या सुट्ट्यांमुळे फिरायला जायचं नियोजन करतात. तथापि, वेगवेगळ्या राज्यांनी त्यांच्या सीमांमध्ये प्रवेश करण्यासाठी काही नियम निश्चित केले आहेत. काही राज्यात आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे, तर कुठे लसीकरण प्रमाणपत्र. कोणत्या राज्यात जाण्यासाठी आरटी-पीसीआरचा अहवाल किंवा लसी प्रमाणपत्र आवश्यक आहे ते जाणून घ्या.

छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेशासाठी नियम

छत्तीसगड सरकारने मंगळवारी विमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश करण्याआधी ९६ तासांच्या आत केलेले आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट्स घेणे अनिवार्य केले आहे. कर्नाटक सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातून राज्यात येणाऱ्या लोकांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केले आहेत. राज्यातील वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशाने राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांसाठी ७२ तासांचा आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य केला आहे. जर तुम्ही लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतले असतील तर तुम्ही लसीकरण प्रमाणपत्र घेऊन राज्यात येऊ शकता.

गोव्यासाठी हे आहेत नियम

५ ऑगस्टपासून केरळ ते तामिळनाडू प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाकडे आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्यास चेन्नईला ते येऊ शकतात. तुम्ही राज्यात कोणत्या मार्गांनी प्रवेश करता याची पर्वा न करता, अहवाल असणे आवश्यक आहे. केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी गोव्याने आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य केला आहे.

पश्चिम बंगालसाठी नियम

पश्चिम बंगाल सरकारने पुणे, मुंबई आणि चेन्नई येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर अहवाल अनिवार्य केला आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणामध्ये नकारात्मक अहवालाची आवश्यकता नाही. ज्या लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे त्यांना राजस्थान आणि नागालँडमध्ये नकारात्मक अहवाल देण्याची गरज नाही.

ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना छत्तीसगड, मणिपूर, ओडिशा, त्रिपुरा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये नकारात्मक आरटी-पीसीआरची गरज नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Check states that need rt pcr report or vaccine certificate before travelling for festivals ttg

ताज्या बातम्या