Shiv Jaynati 2025 Wishes In Marathi : दरवर्षी १७ मार्च रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म तिथीनुसार, १७ मार्च १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. मुघल साम्राज्याला हादरवणारे आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आज प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त प्रत्येक शिवप्रेमीला, मित्रपरिवाराला खास शुभेच्छा पाठवूया आणि शिवरायांना अभिवादन करूया…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खास शुभेच्छा Shiv jayanti Wishes Quotes In Marathi:

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ जय शिवराय

चारी दिशांत ज्याचा गाजावाजा,
एकच होता असा राजा,
नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्मला
शिवनेरी किल्ल्यावर माझा भगवा फडकला
नाही जगात दुसरा कोणी माझ्या छत्रपतीवानी
नाही होणार दुसरा कोणी माझ्या छत्रपतीवानी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

किती राजे आले आणि किती राजे गेले;
पण तुमच्यासारखे कोणी नाही…
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारतभूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा…!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

नाही जातीपातींत अडकला माझा देव होता उदार…
अठरा पगड जाती हाताशी गावला नाय शूर-वीर
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणाऱ्या राजाला म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

महाराजांनी आम्हाला घडवलं,
जगण्यास बळ दिलं..
तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत…
असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं…
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या रक्ताने धुतले जरी तुमचे पाय,
तरी तुमचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गीते गाती, ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’
सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!