नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात चॉकलेटमध्ये शिसे आणि कॅडमियमसारख्या घातक धातूंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे, असं समोर आलं आहे. हे धातू लहान मुलांसाठी प्रचंड हानिकारक असतात. याबद्दल अभ्यास नेमकं काय सांगतो ते पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील कंझ्युमर रिपोर्ट्स या संस्थेने चॉकलेट उत्पादनांची पडताळणी केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, चॉकलेट उत्पादनांमध्ये शिसे आणि कॅडमियम यांच्यासारख्या घातक धातूंचा मोठ्या प्रमाण वापर केला जात आहे.

व्यासायिक सुरक्षा व आरोग्य प्रशासनाच्या मते, कॅडमिअम हा एक मऊ स्वरूपाचा धातू असून तो अत्यंत घातक असतो, हा धातू बॅटरी, प्लास्टिक आणि सिगारेटमध्ये देखील आढळतो. तर शिसे हा धातू माती, पाणी, हवा व घरांमध्ये आढळतो. असं युनायटेड स्टेट्सच्या पर्यावरण संरक्षण एजन्सीचे म्हणणे आहे. हे दोन्ही घटक चॉकलेटच्या बियांमध्ये आढळतात. म्हणूनच या धातूंचे प्रमाण मिल्क चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेटमध्ये अधिक असते.

“हानिकारक घटकांचं प्रमाण ज्या चॉकलेट्समध्ये कमी असले अशी चॉकलेट्स आठवड्यातील काही दिवस खाल्ल्याने त्याचा वाईट परिणाम होणार नाही.” असं या विषयावर अभ्यास करणाऱ्या तुंडे अकिनले (Tunde Akinleye) यांनी फोर्ब्सला माहिती देतांना सांगितलं.

हे धातू शरीरावर कोणते परिणाम करतात?

लहान मुलांच्या शरीरामध्ये शिशाचे प्रमाण वाढल्यास त्यांच्या मेंदूचा विकास होत नाही. त्यांच्या मेंदूची वाढ खुंटते. याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होऊन, त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. चॉकलेटमध्ये असलेल्या कॅडमियम आणि शिसामुळे लहान मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. त्यामुळे मुलांनी जास्त प्रमाणावर चॉकलेट खाणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड हानिकारक ठरू शकतं.

हेही वाचा : मुलांना वरचेवर येतोय ताप? हे चांगलं लक्षण नाही, जाणून घ्या याची कारणं…

चॉकलेटमधील शिसे व कॅडमियमचा परिणाम गर्भवती महिलांवरदेखील होतो. गर्भवती महिलांनी चॉकलेट खाल्ल्याने गर्भातील बाळावर त्याचा परिणाम होतो. हे घातक धातू त्यांच्या मेंदू आणि शारीरिक विकासात अडथळा निर्माण करू शकतात.

अभ्यासात सांगितल्यानुसार काही चॉकलेटमध्ये शिसे आणि कॅडमियम यांसारख्या घातक धातूंचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे अशा जीवघेण्या धातूंच्या सेवनाने उच्च रक्तदाब, किडनीचे आजार होतात. मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे कॅडमियमच्या सेवनाने हाडं ठिसूळ होणं, यकृत आणि फुफ्फुसावरदेखील परिणाम होतो. एवढंच नाही तर या धातूंमुळे कॅन्सरसारखा गंभीर आजारदेखील होण्याची शक्यता असते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chocolate can be harmful for your health because of these 2 ingredients dha
First published on: 29-10-2023 at 13:47 IST