सध्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यातच आज कोलोस्ट्रॉलची समस्या खूप लोकांना भेडसावत आहे. मात्र तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थाचा समावेश केल्याने तुम्हाला कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत होईल.

शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल नसांमध्ये रक्त परिसंचरण रोखू शकते, ज्यामुळे शरीरात हृदयविकाराच्या झटक्यासारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. येथे आम्ही अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, त्यांचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकत नाही तर कोलेस्ट्रॉलच्या पातळीतही बदल करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात…

या ४ गोष्टींद्वारे कोलेस्ट्रॉल कमी करा

ऑलिव ऑइल

दिवसातून 2 चमचे ऑलिव्ह ऑईल वापरल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे (LDL) प्रमाण कमी होते, तसेच ते अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असल्याने फायदेशीर ठरते.

नट्स

ज्या गोष्टींमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते ते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. हे सामान्यतः काजू आणि बदामांमध्ये आढळते.

लसूण

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण हा सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय मानला जातो. हे कोलेस्टेरॉल कमी करते आणि इतर प्रकारचे संक्रमण टाळते. दिवसातून २-४ लसणाच्या पाकळ्या जेवणासोबत घेतल्यास आरोग्य चांगले राहते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट हे नैसर्गिकरित्या खूप चांगले अँटी-ऑक्सिडंट आहे. डार्क चॉकलेट चांगले असते कारण त्यात इतरांपेक्षा ३ पट जास्त अँटी-ऑक्सिडंट असतात.