How to clean your Mangalsutra: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक विवाहित महिला मंगळसूत्राला सौभाग्य अलंकार म्हणून परिधान करते. हा केवळ विवाहित महिलांचा अलंकार नाही तर भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीकदेखील आहे. मंगळसूत्र पतीच्या दीर्घायुष्याचे आणि वैवाहिक आयुष्याचे प्रतीक मानले जाते. तथापि, सतत मंगळसूत्र घातल्यानंतर ते कालांतराने काळे पडते. ज्यामुळे त्याची चमक कमी होते. अशावेळी ते घरच्या घरी साफ कसे करायचे हे आपण जाणून घेऊ
घरी मंगळसूत्र स्वच्छ करण्यासाठी टिप्स
बेकिंग सोडा आणि पाणी
मंगळसूत्र स्वच्छ करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि मऊ ब्रश किंवा कापसाच्या मदतीने साफ करा. त्यानंतर ते साध्या पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून टाका; अशाप्रकारे मंगळसूत्र नव्यासारखे चमकू लागेल.
बेसन आणि हळद
तुम्ही बेसन आणि हळदीने मंगळसूत्र सहज स्वच्छ करू शकता. यासाठी बेसन पिठात थोडी हळद आणि पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट मंगळसूत्रावर हलक्या हाताने लावून पुसा आणि पाण्याने धुवून घ्या.
टुथपेस्टचा करा वापर
मंगळसूत्र साफ करण्यासाठी सफेद रंगाची टुथपेस्ट ब्रशवर लावा आणि हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून घ्या, यामुळे त्यावरील घाण निघण्यास मदत होईल.
लिंबू आणि मीठ
लिंबू आणि मिठाच्या मदतीनेदेखील तुम्ही मंगळसूत्र साफ करू शकता. यासाठी लिंबाच्या रसात तुम्ही एक चिमूट मीठ घाला आणि कापसाच्या मदतीने मंगळसूत्रावर लावून स्वच्छ करा.
डिशवॉशिंग लिक्विड
गरम पाण्यात डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब घालून यामध्ये मंगळसूत्र भिजत घाला, त्यानंतर ते ब्रशने साफ करा.