कोरडे वातावरण आणि हिवाळ्यात थंड वारे यामुळे त्वचेची तसेच टाळूची आर्द्रता कमी होऊ लागते. त्यामुळे काही लोकांच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. डोक्यातील कोंड्यामुळे केवळ टाळूला खाज येत नाही तर याने केस देखील गळतात आणि केस पांढरे होतात. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या ऋतुत तुम्ही केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तुमचे केस हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता.

नारळ पाणी

नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, एमिनो अॅसिड, एन्झाईम्स, बी व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. तज्ज्ञांच्या मते नारळाच्या पाण्यात दुधापेक्षा जास्त पोषक तत्वे आढळतात. केसांमधला कोंडा दूर होण्यास खूप मदत होते. तुम्ही तुमच्या केसांवर नारळाचे पाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.

केस मजबूत करण्यासाठी वापरा नारळ पाणी

केस मजबूत करण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याने टाळूची मालिश करू शकता. नियमित मसाज केल्याने केसांची लवचिकता वाढते आणि केस गळणेही कमी होते.

खाजेपासून मिळवा सुटका

खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही नारळपाणी खूप प्रभावी आहे. कारण ते टाळूला पोषक तत्व देऊन हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसेच कोंड्याची समस्याही दूर होते.

केस मऊ करा

नारळ पाणी केसांमधील स्प्लिट एंड्सपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे. यामध्ये असलेले दाहक-विरोधी घटक टाळूवर संसर्ग होऊ देत नाहीत.

अश्या पद्धतीने केसांमध्ये वापरा नारळ पाणी

नारळ पाणी आणि लिंबू

तुम्ही नारळाच्या पाण्यात लिंबू मिक्स करून तुमच्या टाळू आणि केसांना लावू शकता. २० मिनिटे केस असेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने डोके धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा ही पद्धत फॉलो करू शकता.

नारळ पाणी आणि ऍपल सायडर व्हिनेगर

यासाठी एक कप नारळाच्या पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळा. नंतर हे द्रावण केसांवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने डोके धुवा.