Coconut Water Vs Lemon Water: उन्हाळा सुरू आहे आणि आपल्यापैकी बहुतेक जण थंड, हलक्या पेयाचे सेवन करतात. त्यातच वर्षानुवर्षे आपले स्थान टिकवून ठेवलेली दोन पेये म्हणजे नारळ पाणी आणि लिंबू पाणी. वर्कआउटनंतर रिफ्रेश होण्यासाठी किंवा बाहेरून घरी आल्यावर भरउन्हात आपण याच पेयांचे सेवन करतो. पण, प्रामाणिकपणे सांगायचे तर- तुम्ही कधी थांबून स्वतःला विचारले आहे का की, कोणते पेय आपल्या आरोग्यासाठी खरोखर आरोग्यदायी आहे? तुमचे आवडते उन्हाळी पेय फायद्यापेक्षा जास्त नुकसान करीत आहे का; विशेषतः जर ते रेस्टॉरंट किंवा कॅफेमधून येत असेल तर? तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे.

नारळ पाण्याचे ५ आरोग्यदायी फायदे

१. वजन कमी करण्यास मदत – तुम्हीही कॅलरीज कमी करण्याचा प्रयत्न करीत आहात का? नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरीत्या कॅलरीज कमी असतात आणि त्यात चरबी नसते. तुम्हीही वजन करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर वजनाचा जास्त ताण न घेता हे पेय सातत्यानं पिऊ शकता.

२. नैसर्गिकरीत्या हायड्रेटिंग – नारळाचे पाणी डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी आदर्श आहे; विशेषतः जेव्हा उष्णता असह्य होते.

३. हृदयासाठी चांगले – काही अभ्यास असे सूचित करतात की, नारळाचे पाणी रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे चांगले रक्ताभिसरणदेखील होते, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

४. पचनास साह्यभूत – नारळ पाणी पोट शांत करण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठीचे पेय म्हणून ओळखले जाते. जास्त खाल्ल्यानंतर किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असताना ते घेणे खूप फायदेशीर आहे.

५. त्वचेसाठी चांगले – नारळ पाण्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे तुमची त्वचा कमी तेलकट दिसण्यास आणि अधिक ताजेतवाने वाटण्यास मदत करू शकते. उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी याचे सेवन योग्य ठरू शकते.

लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे

१. वजन नियंत्रण – लिंबू पाण्याच्या सेवनानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ते पचन आणि चयापचयाला समर्थन देऊ शकते

२. रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ – लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि त्याचा अर्थ लिंबू पाणी तुमच्या शरीराला सामान्य संसर्गांशी लढण्यास मदत करू शकते. तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवायची असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे.

३. विषाक्त पदार्थांचे निर्मूलन – नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्याने विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे मुरमे आणि इतर पिंपल्स कमी होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहते.

४. पचनशक्तीत सुधारणा – जेवणानंतर लिंबू पाणी पिणे हे पचन सुधारण्यासाठी एक सोपा उपाय आहे. ते अन्नाचे विघटन करण्यास आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करू शकते.

५. हायड्रेटेड राहण्यास मदत – लिंबू पाणी तुम्हाला अधिक पाणी पिण्यास आणि हायड्रेटेड राहण्यास मदत करते.

नारळ पाणी विरुद्ध लिंबू पाणी : कोणते चांगले?

पोषणतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी हे स्पष्ट केले. त्यांच्या मते, नारळ पाण्यात साधारणतः ५० कॅलरीज असतात. दुसरीकडे जर तुम्ही घरी दोन चमचे साखर घालून लिंबू पाणी बनवत असाल, तर ते सुमारे ४० कॅलरीज होतात. “दोन्ही पेये त्यांच्या स्वतःच्या अर्थाने पौष्टिक आणि हायड्रेटिंग आहेत. याचा अर्थ नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्हीही फायदेशीर आहेत. ते फक्त तुमच्या शरीराला कशाची जास्त गरज आहे यावर अवलंबून असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारळ पाणी विरुद्ध लिंबू पाणी : कोणते टाळावे? दोन्ही पेये आरोग्यदायी आहेत; पण एक गोष्ट अशी आहे जी ते पूर्णपणे बदलू शकते: साखर. ती तुमच्या पेयांमध्ये जाते आणि तुम्हाला कळतही नसताना कॅलरीजची संख्या वाढवते. विशेषतः लिंबू पाण्यामध्ये, साखर अनेकदा घरी किंवा बाहेर जेवताना मिसळली जाते. त्यामुळे साखर एकत्र करुन सेवन करणं टाळावे.