Effect of green spaces on mental health: शहरात राहणं ही सध्याची गरज बनली आहे. काहींसाठी नागरी जीवन हे एखाद्या लक्झुरीपेक्षा कमी नाही, कारण गावांमध्ये वीज, पाणी आणि रस्ते यासारख्या मुलभूत सुविधांचा अभाव असू शकतो. तुम्ही शहराच्या काँक्रिटच्या जंगलात राहत असाल, पण कधी कधी विश्रांती घेऊन हिरव्यागार जागांना भेट दिली तर तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल.
किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधनानुसार, निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्याने किंवा अशा जागांवर वेळ घालवल्याने चिंता, स्ट्रेस कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. शिवाय, निसर्ग आणि हिरवळीशी नियमितपणे संवाद साधल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकते. दररोज १० ते ३० मिनिटे निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवल्याने स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसोलची पातळी कमी होऊ शकते.
तुम्हाला हे माहीत आहे का की, निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे तुम्ही आवर्जून या ठिकाणी गेलं पाहिजे.
उद्यान
काँक्रिटच्या वाढत्या जंगलात शहराला हिरवेगार ठेवण्यासाठी उद्याने तयार केली जातात. जर तुम्हाला शांत, निसर्गात वेळ घालवण्यासाठीही वेळ काढता येत नसेल, तर तुम्ही उद्यानं आणि बागांमध्ये शांततेत वेळ घालवू शकता.
विकेंड ट्रिप
आठवड्याच्या शेवटी जेव्हा सुट्टी असते, तेव्हा तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी एक छोटीशी सहल आयोजित करू शकता. यामुळे तुम्हाला शहरातील धावपळीतून आराम मिळेल आणि ते मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.
हिरव्या गवतावर चाला
मातीशी पुन्हा जोडले जाण्यासाठी तुम्ही सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालायला जाऊ शकता. हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे स्नायूंचा ताण कमी होऊ शकतो.
जंगल
जंगलात कॅम्पिंग करणे हा निसर्गाशी कनेक्ट होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि सकारात्मक भावना वाढू शकतात.
आजूबाजूच्या परिसरात झाडे लावा
तुमच्या घरासमोर किंवा बाल्कनीमध्ये काही मोकळी जागा असेल, तर तुम्ही ती बागकामासाठी वापरू शकता. तुमच्या घराला ताजे करण्यासाठी तुम्ही तिथे झाडे लावू शकता. जर तुमच्याकडे बागेसाठी जागा नसेल तर कुंडीत लावलेली रोपं खरेदी करू शकता आणि बाल्कनीत ठेवू शकता.