मनुका हे एक प्रकारचे ड्रायफ्रूट आहे. जे खाण्यास अतिशय चवदार तर आहेच, पण ते अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांपासून सुटका करते. गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या या मनुक्यांमध्ये प्रथिने, फायबर, लोह, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन-बी ६ आणि मॅंगनीजसह सर्व प्रकारचे आवश्यक पोषक घटक असतात. आरोग्य तज्ञांच्यानुसार १०- १२ मनुकाचे नियमित सेवन केवळ हाडे मजबूत करत नाही तर पुरुषांमधील लैंगिक समस्यांवरही मात करू शकते.

तसेच तुम्ही हे मनुके असच खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही जर हे मनुके पाण्यात भिजवून खाल्ले तर हे अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच विशेषतज्ञ नेहमी भिजवलेले मनुका खाण्याची शिफारस करतात. यासाठी रात्री २०-३० मनुका पाण्यात भिजवा, नंतर सकाळी उठून रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

मनुका खाण्याचे फायदे:

दात, हिरड्या आणि हाडे मजबूत राखणे

मनुकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे दात, हिरड्या आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. १०० ग्राम मनुकामध्ये सुमारे ५० मिलीग्राम कॅल्शियम असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही मनुका नियमितपणे सेवन केल्याने दात आणि हिरड्यांचा त्रास होणार नाही.

पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त

एका संशोधनानुसार मनुका खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन शक्ती सुधारते. कारण मनुकामध्ये शुक्राणूंची गतिशीलता वाढवणारे गुणधर्म असतात. याकरिता हेल्थ एक्सपर्ट्स पुरुषांना दुधासोबत मनुका खाण्याचा सल्ला देतात.

रक्तदाब नियंत्रित करते

मनुकामध्ये पोटॅशियमची चांगली मात्रा आढळते. ज्यामुळे शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे मनुका सेवन केल्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो.

पचन शक्ती सुधारते

ज्यांना बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या आहे. त्यांच्यासाठी मनुका सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. मनुकामध्ये असलेले फायबर पचन प्रक्रिया धीमी करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

मनुका रोग प्रतिकारशक्ती वाढवते

तुम्ही नियमित मनुक्याचे सेवन केल्यास शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. कारण मनुकामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे महत्त्वपूर्ण प्रमाण असते. जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.)