महामारीच्या या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे. म्हणूनच डॉक्टरसुद्धा हा सल्ला देतात की आपली रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवणारा आहार घ्यावा. या यादीत दूध हा नेहमीच आपल्या आरोग्यदायी आहाराचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. तसे, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचे दूध पिणे आवडते. पण काही तज्ञ म्हणतात की गाईचे दूध पिणे सर्वात फायदेशीर आहे. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात आणि काम करण्याची क्षमता वाढते.

आता ताज्या अभ्यासातून असे समोर आले आहे की गाईचे दूध देखील कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त आहे. डेली मेलमधील बातमीनुसार, अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, गायीच्या दुधात व्हायरस प्रतिबंधक गुणधर्म असलेले प्रोटीन असते. हे प्रोटीन एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखू शकते. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

दररोज इतकी मिनिटं सायकल चालविल्याने पोटाची चरबी होणार कमी; अनेक गंभीर आजारांपासूनही मिळेल सुटका

बहुतेक सस्तन प्राण्यांच्या दुधात लैक्टोफिरन नावाचे प्रथिन आढळते. संशोधकांना त्यांच्या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की गायीच्या दुधात बोवाइन लैक्टोफेरिन नावाचे प्रोटीन आढळते, जे अनेक सूक्ष्मजंतू, विषाणू आणि इतर रोगजनकांशी लढण्यास सक्षम आहे. चाचणी दरम्यान, असे आढळून आले की हे प्रोटीन SARS-CoV-2 विषाणूंना पेशींमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करते, तसेच पेशींना विषाणूविरूद्ध लढण्यास मदत करते.

मिशिगन विद्यापीठातील अंतर्गत औषध विभागाचे मुख्य अन्वेषक जोनाथन सेक्स्टन म्हणाले की, मानवी क्लिनिकल चाचण्यांदरम्यान बोवाइन लैक्टोफेरिनने अँटीव्हायरल अ‍ॅक्टिव्हिटी दर्शविली. उदाहरणार्थ, बोवाइन लैक्टोफेरिन असलेली औषधे व्हायरल इन्फेक्शनची तीव्रता कमी करण्यास सक्षम आहेत. यामध्ये रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरसचा समावेश आहे.

पोहे आहेत एक आरोग्यदायी नाश्ता; याचे ‘हे’ पाच फायदे तुम्हालाही नसतील माहित

बोवाइन लैक्टोफेरिनचे व्यापक अँटीव्हायरल प्रभाव, सुरक्षितता, कमीत कमी दुष्परिणाम आणि व्यावसायिक उपलब्धता लक्षात घेता, SARS-CoV-2 संसर्गाच्या उपचारात किंवा काळजीमध्ये त्याचा वापर करण्यासाठी अनेक शोधनिबंध नोंदवले गेले आहेत.