Natural Remedies for Nausea and joint pain: आपल्या रोजच्या आहारातील छोटे बदल आपल्या आरोग्यावर मोठे परिणाम घडवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे लवंग (Cloves) हा लहानसा मसाला; परंतु प्रचंड गुणधर्मांचा ठेवा. लवंग आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे या मसाल्याशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच. मसाल्यांमधील लवंग ही औषधी आणि महत्त्वपूर्ण घटकांनी भरलेली असून ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. फक्त एक लवंगच तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी चमत्कार घडवू शकते, असे पोषणतज्ज्ञ भक्ती अरोरा कपूर यांनी सांगितले आहे.
लवंग, ज्याला आपण ‘लौंग’ म्हणूनही ओळखतो, ही फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, संसर्गांपासून संरक्षण करतात आणि पचन सुधारतात. तसेच सांधे दुखणे, मळमळ, पोट फुगणे किंवा दातांच्या आरोग्याशी संबंधित समस्या असल्यासही एक छोटीशी लवंग उपशमन करू शकते.
डॉक्टर रहिथा ओ आर, डायटीशियन, अमृता हॉस्पिटल, कोची, यांच्या म्हणण्यानुसार, “सकाळी एक लवंग चावल्याने तोंडातील लाळेचे उत्पादन वाढते, जे पचनास मदत करते; यामुळे मळमळ, ॲसिडिटी कमी होते. लवंग वयोमानानुसार होणाऱ्या बदलांपासून संरक्षण करू शकते. याचा वापर खोकल्यावरही उपयुक्त ठरतो.”
भक्ती अरोरा कपूर म्हणतात, “एक लवंग चावल्यावर केवळ चवीसाठी नव्हे तर तोंडातील जंतुनाशक गुणधर्मांचा फायदा होतो, ज्यामुळे दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यास मदत होते.”
लवंगाचे अनेक फायदे आहेत – यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असून, यामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते. यामुळे पचनास मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जठरदाह कमी होतो, बद्धकोष्ठता सुटते आणि नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ती काम करते.
नुसते हेच नव्हे, तर सांधेदुखीवरही लवंग प्रभावी ठरते. मळमळ किंवा नाकासंबंधी त्रास असल्यासही रोज १-२ लवंग रिकाम्या पोटी चावल्यास फायदा होतो.
अरोशी गर्ग, पोषणतज्ज्ञ, GOQii यांनी सांगितले की, “सुकलेल्या लवंगाच्या कळ्या यकृताचे संरक्षण करतात, यामुळे नवीन पेशींचा विकास होतो, यकृत शुद्धीकरण होते आणि सक्रिय घटक जसे की थायमॉल आणि यूजिनॉल यामुळे यकृताचे संरक्षण होते.”
तर मग रोज एक लवंग चावून आरोग्याचा प्रवास सुरू करा, शरीराचे संरक्षण करा आणि नैसर्गिक आरोग्याचा अनुभव घ्या. छोटा मसाला, पण प्रचंड आरोग्यदायी परिणाम!
