दिवाळीच्या दिवसांमध्ये मिठाईंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदाही घेतला जातो. यामुळे या मिठाईत बनावट पदार्थ मिसळण्याची शक्यताही असते. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त व बनावट मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. या मिठाईमुळे व्यक्तीच्या आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो.

नुकतेच १४ ऑक्टोबर २०२२ रोजी अकोला येथील अन्न व औषधे प्रशासन विभागाने दोन विविध ठिकाणी कारवाई करत ४८६ किलो १ लाख ६ हजार ६०० रुपयाची मिठाई जप्त केली आहे. बऱ्याचवेळा आपण खरेदी केलेली मिठाई ही शुद्ध असेल की नाही याबाबत काही माहिती सांगू शकत नाही. अनेकदा भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. अशावेळी चांगली आणि भेसळ नसलेली मिठाई निवडता यावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकल्या जाणारी अशी बनावट मिठाई कशाप्रकारे ओळखता येईल, हे जाणून घेऊया…

आणखी वाचा : दिवाळीच्या फराळासाठी बजेट फ्रेंडली किराणा सामानाची यादी; सर्व पदार्थांना पुरतील ‘या’ ५ वस्तू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पद्धतीने ओळखा बनावट मिठाई

  • मिठाईचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील यलो रंगाची भेसळ असल्याचे समाजावे.
  • मिठाई व खव्यावर तीनचार आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल.
  • मिठाई किंवा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वास आला तर भेसळ समजावी.
  • मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच तेलकट वाटला तर त्यात भेसळ असू शकते.
  • भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळात मळमळ, उलटी व जुलाब सुरू होतात.
  • मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करण्यापूर्वी मिठाईचा वास येत असल्याची खात्री करा. जर ते शिळे असेल तर त्याला आंबट चव येईल.