What Not to Eat with Ghee: भारतीय स्वयंपाकघरात तुपाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. चविष्ट आणि पौष्टिक अशी तुपाची ओळख आपल्याला लहानपणापासूनच आहे. पण तुम्हाला माहितेय का, तूप जसं शरीरासाठी फायदेशीर आहे, तसंच काही अन्नपदार्थांसोबत खाल्लं तर घातकही ठरू शकतं? होय! आयुर्वेदानुसार, काही विशिष्ट गोष्टी तुपाबरोबर खाल्ल्यास तुमचं पचन बिघडू शकतं, टॉक्सिन तयार होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं आणि तुमचं पोट अक्षरशः बिघडू शकतं.

तूप म्हणजे आरोग्यासाठी अमृत मानलं जातं, पण हेच अमृत विष कधी बनतं हे तुम्हाला माहीत आहे का? आयुर्वेदिक डॉक्टरांनी उघड केलेले हे धक्कादायक सत्य वाचून तुम्हालाही धक्का बसेल. काही पदार्थ तुपाबरोबर खाल्ले तर शरीराला पोषण मिळण्याऐवजी होतो गंभीर धोका. कोणते आहेत हे पदार्थ? आणि तुपाचे ‘विषारी’ कॉम्बिनेशन टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? यावर आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अन्नघटक तुपाच्या एकत्र सेवनाने शरीरावर विपरित परिणाम करू शकतात. त्यांनी यासाठी चार प्रमुख पदार्थांचे उल्लेख केले आहेत.

चुकूनही तूपाबरोबर खाऊ नका हे पदार्थ

तूप आणि मध

शुद्ध मध आणि तूप दोन्ही स्वतःहून आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण, दोन्ही गोष्टी बरोबर प्रमाणात मिसळून खाल्ल्यास हे मिश्रण एकप्रकारचा विषारी पदार्थ बनतो, असं आयुर्वेद म्हणतं. त्यामुळे मेटॅबॉलिझम बिघडतो, पचन ढासळतं आणि शरीरात विषारी घटक तयार होतात.

माशा आणि तूप

आयुर्वेदानुसार, मासे आणि तूप एकत्र खाऊ नये. माशा उष्ण असतात, तर तूप थंड असतो. या दोन विरुद्ध असलेल्या गोष्टी एकत्र खाल्ल्यास पचन बिघडतं, त्वचेला रॅशेस, ॲलर्जी यांसारख्या समस्या होतात. त्यामुळे हे घातक कॉम्बिनेशन टाळणं अत्यंत आवश्यक आहे.

मुळा आणि तूप

मुळा ही एक भाजी आहे. ही जेव्हा थंड आणि तैलयुक्त तुपाबरोबर खाल्ली जाते, तेव्हा अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या तक्रारी सुरू होतात. ह्या संयोजनामुळे पचनतंत्रावर विपरीत परिणाम होतो.

दही आणि तूप

दोन्हीही पदार्थ तैलयुक्त, थंड आणि पचायला जड. एकत्र खाल्ल्यास पाचन क्रिया मंदावते आणि शरीरात विषारी घटक साठतात, यामुळे त्वचेच्या तक्रारी वाढतात.

निष्कर्ष : तूप खाणं योग्य आहे, पण कशासोबत खाल्लं जातंय हे अधिक महत्त्वाचं! वर दिलेले कॉम्बिनेशन टाळा आणि तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवा!