Natural Drink to Control Blood Sugar: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सर्वाधिक वाढलेला आजार म्हणजे मधुमेह (डायबेटीस). आधी ज्येष्ठांमध्ये आढळणारा हा आजार आता तरुणांनाही आपल्या विळख्यात घेत आहे. एकदा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, ते नियंत्रित करणे म्हणजे अक्षरशः डोकेदुखीच ठरते. जगभरात वाढत चाललेले मधुमेहाचे प्रमाण अनेकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करीत आहे. पण तुम्हाला असं सांगितलं तर? की, फक्त एका घरगुती नैसर्गिक उपायाद्वारे तुम्ही मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता आणि त्याचबरोबर इतर तीन मोठ्या आजारांनाही आळा घालू शकता?

होय, प्रसिद्ध योगगुरू व आरोग्य विशारद डॉ. हंसा योगेंद्र यांनी एक असं नैसर्गिक पेय सांगितलं आहे, जे मधुमेहाचा नायनाट करू शकते. त्या म्हणतात की, मेथीच्या दाण्यांचे पाणी हे केवळ रक्तातील साखरेचे प्रमाणच नियंत्रित करीत नाही, तर शरीरातील इतर घातक आजारांपासूनही संरक्षण मिळवून देते.

मेथी दाण्याचे पाणी – आरोग्याचा खजिना

मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले गुणधर्म म्हणजे जणू निसर्गाने दिलेले औषधी वरदानच. मेथीमध्ये प्रो-बायोटिक आणि फायबरचे गुण असतात. हे घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच या दाण्यांचे पाणी नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

त्याचबरोबर मेथीचे पाणी मूत्रपिंडाचे कार्य सुधारते, हृदयविकाच्या झटक्याचा धोका कमी करते आणि डोळ्यांच्या आजारांपासूनही संरक्षण मिळवून देते. म्हणजेच एकाच उपायाने शरीरातील तीन घातक आजार – मधुमेह, हृदयविकार व मूत्रपिंडाचे आजार यांवर नियंत्रण मिळवता येते.

मेथीतील पौष्टिक घटक

मेथीच्या दाण्यांमध्ये सोडियम, झिंक, फॉस्फरस, फोलिक अॅसिड, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तसेच ए, बी व सी हे व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. त्या दाण्यांतील फायबर, प्रोटीन व नैसर्गिक स्टार्च शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतो. या पोषक घटकांमुळे शरीरात ग्लुकोजची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहते.

कसे बनवायचे मेथीचे पाणी?

  • रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथी दाणे एका ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा.
  • सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
  • एवढंच नव्हे, तुम्ही मेथीच्या दाण्यांचा चहादेखील तयार करू शकता.
  • त्यासाठी मेथीचे दाणे उकळत्या पाण्यात टाकून काही मिनिटे उकळा आणि त्यात थोडा लिंबाचा रस मिेळा.

हा पेय केवळ चविष्टच नाही, तर ते आरोग्यासाठीही वरदान ठरते.

मधुमेह, हृदयविकार व मूत्रापिंडाचे आजार यांवर एकच रामबाण उपाय

डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, जर तुम्ही दररोज मेथीच्या दाण्यांचं पाणी पिण्याची सवय लावली, तर काही दिवसांतच शरीरात फरक जाणवेल. रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरीत्या खाली येईल. हृदय अधिक निरोगी बनेल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.

आजच्या काळात जिथे रक्तशर्करेवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांवर हजारो रुपये खर्च होतात, तिथे हे एक साधेसे वाटणारे घरगुती पाणी तुम्हाला नैसर्गिक आणि कायमस्वरूपी सकारात्मक परिणाम देऊ शकतं.

सावधान!

मेथीचं पाणी जरी आरोग्यदायी असलं तरी ते जास्त प्रमाणात घेतल्यास पोटदुखी किंवा रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दररोज हे एक ग्लासभर पाणी पिणे पुरेसं आहे.

हे पाणी मधुमेहींसाठी वरदान!

ज्यांना मधुमेह, हृदयविकार व मूत्रपिंडाचे आजार अशा समस्या आहेत, त्यांच्यासाठी मेथीच्या दाण्यांचं पाणी म्हणजे आयुष्य बदलणारा उपाय आहे. निसर्गातील हा छोटासा चमत्कार तुमचं आरोग्य पुन्हा पूर्ववत करू शकतो.