नवजात बाळासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम आहार आहे. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी बाळाच्या जन्मापासून ते ६ महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान देणे आवश्यक आहे. भारतीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने देखील नवजात बाळाच्या जन्माच्या पहिल्या सहा महिन्यांसाठी विशेष स्तनपान देण्याची शिफारस केली आहे.

स्तनपान करणार्‍या मातांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बाळाच्या आईने पोषक तत्वांनी युक्त असलेला आहार घेतला तरच आईच्या दुधात वाढ होऊन मूल निरोगी राहील. दरम्यान स्तनपान करणा-या मातेच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ आणि पेय चांगले आहेत असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो.

स्तनपान करणाऱ्या मातांना त्यांच्या दैनंदिन कॅलरीचे प्रमाण वाढवले पाहिजे. स्तनपानाच्या पहिल्या सहा महिन्यांत आईने अतिरिक्त ३३० ते ४०० कॅलरीज वापरणे आवश्यक आहे. आईच्या उष्मांकाच्या गरजा शरीराचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) वर आधारित असतात. स्तनपान करणार्‍या मातांचा आहार कसा असावा हे जाणून घेऊया.स्तनपान करणार्‍या मातांनी आहारात जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करा. स्तनपान करणाऱ्या मातांनी त्यांच्या आहारातील कॅलरीजचे प्रमाण वाढवण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त अन्न सेवन केले पाहिजे. आहारात मोड आले धान्य तसेच ब्रेड यांचे सेवन करावे, तुम्ही ब्रेडवर एक चमचा (सुमारे १६ ग्रॅम) पीनट बटर लावून खाऊ शकता. दररोज एक केळी किंवा सफरचंद खावे.

आईचे दूध वाढवण्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थ खा. मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, बीन्स, मसूर आणि सीफूड, विविध प्रकारचे धान्य, फळे आणि भाज्या यांचे नियमित सेवन करा.

स्तनपान करणार्‍या मातांनी पाण्याची विशेष काळजी घ्या. दिवसातून जितक्या वेळा तुम्ही बाळाला दूध पाजता तितक्या वेळा एक ग्लास पाणी प्या.

स्तनपान करणार्‍या मातांनी आहारात कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करा. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ मिळवण्यासाठी तुम्ही आहारात गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.

Health Tips : ‘या’ शारीरिक समस्यांचा सामना करत असाल तर चुकूनही खाऊ नका बदाम; होऊ शकते मोठे नुकसान

दररोजच्या आहारात अधिक प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनयुक्त आहारामध्ये तुम्ही मूग डाळ, तूर डाळ, सोया, राजमा, चणे आणि मोड आलेले कडधान्य यांचा समावेश करावा. त्याच बरोबर दूध, लो फॅट चीज, कॉटेज चीज, बटर मिल्क, दही यांचा देखील आहारात समावेश करा.

आहारात पालक, मेथी, शेपू अशा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. रोजच्या आहारात एक तरी पालेभाजी खावी. या भाज्या स्तनपान करणार्‍या मातांचे दूध वाढवण्यासाठी प्रभावी आहे.

लोह, प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध असलेले पदार्थ खा. लोहाच्या चांगल्या स्त्रोतांमध्ये मसूर, तृणधान्ये, हिरव्या पालेभाज्या, मटार आणि मनुका यांसारखी सुका मेवा यांचा समावेश करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)