दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. अगदी लहान मुलांपासून जेष्ठ मंडळींना देखील हा सण खूप आवडतो. रोजच्या कामाच्या व्यापातून कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे या सणांच्या दिवसांमध्ये त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांच्यासोबत आनंदात सण साजरा केला जातो. पण अशावेळी नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना दिवाळीचे काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न दरवर्षी पडतो. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, कोणते आहेत ते पर्याय जाणून घ्या.

दिवाळी गिफ्ट्ससाठीचे पर्याय :

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

  • स्मार्टवॉच – स्मार्टवॉच हे कोणालाही गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय आहे. आजकाल सर्वजण तब्येतीबाबत जास्त जागृक झाले आहेत. त्यामुळे आरोग्याबाबत अपडेट देणारे एखादे स्मार्टवॉच तुम्ही गिफ्ट देऊ शकता.
  • व्हॅक्यूम क्लिनर – जर तुम्हाला घरासाठी उपयोगी असणारी एखादी वस्तू द्यायची असेल तर व्हॅक्यूम क्लिनर उत्तम पर्याय आहे. हाताळण्यास सोपे असणारे अनेक व्हॅक्यूम क्लिनर उपलब्ध आहेत.
  • कॉफी मेकर – अनेकजणांचे कॉफी हे आवडते पेय असते. अशा व्यक्तींना तुम्ही कॉफी मेकर गिफ्ट करू शकता.

आणखी वाचा : रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? ‘या’ सवयी ठरतात कारण; लगेच करा बदल

  • गॅजेट ऑरगनायजर – सध्या एका इलेक्ट्रॉनिक उपकरणासह त्याच्याबरोबर वापरले जाणाऱ्या इतर उपकरणांना देखील सतत आपल्यासोबत किंवा आजुबाजूला ठेवावे लागते. अशावेळी घरात पसारा होतो, यावर उपाय म्हणजे गॅजेट ऑरगनायजर. पेन ड्राईव्ह, हेड फोन, चार्जर, पॉवर बँक, हार्ड ड्राईव्ह अशा सगळ्या वस्तु ठेवण्यासाठी गॅजेट ऑरगनायजर मदत करते. हा गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
  • फुलदाणी, फुलझाडे – निसर्गप्रेमींना फुलदाणी, फुलझाडे गिफ्ट म्हणून देऊ शकता.
  • पास्ता आणि नुडल्स मेकर – खवय्ये मंडळींना तुम्ही पास्ता आणि नुडल्स मेकर देऊ शकता, त्यांना हे गिफ्ट नक्की आवडेल.