दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येकजणांच्या घरात साफ सफाई सुरू झाली आहे. साफ सफाई करताना जास्त वेळ हा स्वयंपाक घरातील उपकरणे स्वच्छ करायला लागतो. हे उपकरणे झटपट स्वच्छ कशी करता येईल, याविषयी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत…
‘या’ पद्धतीने करा उपकरणे झटपट स्वच्छ
फ्रिज
या दिवळीत फ्रिज स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरता येईल. त्याचप्रमाणे तुम्ही एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये विम जेल आणि वाईट विनेगर घालून देखील फ्रिज साफ करू शकता. असे केल्याने फ्रिज स्वच्छ तर होणारच पण सोबत फ्रीजचा दुर्गंधही दूर होईल.
मिक्सर
मिक्सर साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. दोन चमचा व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळून मिक्सरला स्वच्छ करु शकता. मिक्सरला अधिक चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि पाण्याची पेस्ट बनवून देखील मिक्सर साफ करू शकता.
आणखी वाचा : दिवाळीत विकली जाणारी मिठाई भेसळयुक्त तर नाही ना? कसे ओळखायचे जाणून घ्या…
मायक्रोवेव्ह ओव्हन
ओव्हन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस पिळून ते भांडे ओव्हन मध्ये ठेवा. त्यानंतर ओव्हनची क्लिनिंग बटन दाबून ओव्हन चालू करा. थोड्यावेळाने ओव्हन बंद करून मायक्रोवेव्हला आतून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
गॅस शेगडी
गॅस शेगडी स्वच्छ करायचा असेल तर लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा मिक्स करून स्पंजच्या मदतीने ते गॅसवर पसरवून घ्या. नंतर चार-पाच मिनिटे ते तसेच ठेवून स्वच्छ कपड्याने पुसा. यानंतर तुमचा गॅस नव्या सारखा दिसेल.
